गौतम बुद्ध जयंती निमित्त ज्येष्ठ नागरिकांचा सन्मान सोहळा

गौतम बुद्ध जयंती निमित्त राज्य सचिव वैभव गिते व आंबेडकरी चळवळीचे नेते विका स धाईंजे ज्येष्ठ नागरिकांचा सन्मान सोहळा

गौतम बुद्ध जयंती निमित्त ज्येष्ठ नागरिकांचा सन्मान सोहळा
पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क करकंब / प्रतिनिधीनॅशनल दलित मुव्हमेंट फॉर जस्टीस यांच्या वतीने तथागत गौतम बुद्ध यांच्या जयंती निमित्त व महाकवी वामनदादा कर्डक यांच्या जन्मशताब्दी निमित्त भंडीशेगांव मधील महात्मा फुले पेहरावातील सर्व ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार व सन्मान सोहळा आयोजित केलेला होता त्याप्रसंगी राज्य सचिव मा. वैभवजी गिते साहेब व मा. प्रबुद्ध साठे संस्थापक अध्यक्ष प्रजासत्ताक जनता परिषद हे प्रमुख वक्ते म्हणून लाभले होते.

तसचे आंबेडकरी चळवळीचे ज्येष्ठ नेते मा. विकासदादा धाईंजे उपस्थित होते. त्याचप्रमाणे सरपंच सौ. मनिषाताई प्रकाश यलमार व उपसरपंच श्री. विजय कदम पाटील तसेच ग्रा.पं. सदस्या सौ शारदा जाधव, सौ प्रियंका ननवरे, सौ. वनिता ननवरे व उज्जवला गाडे यांच्या शुभहस्ते सर्व महापुरुषांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. हा कार्यक्रम गावातील सर्व ज्येष्ठ लोकांच्या कार्य कर्तृत्वाचा त्यांच्या योगदानाबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हा उपक्रम करण्याचा मानस संघटनेतील सर्व युवकांनी करण्याचे आयोजन केले होते. त्यासाठी गावातील तब्बल ७५ ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार सन्मान करण्याचे भाग्य लाभले आणि सर्व ज्येष्ठांकडून भरघोस मिळालेल्या प्रतिसादामुळे सर्व कार्यकर्त्या मध्ये उत्साहाचे वातावरण दिसून आले. यावेळी संघटनेचे जिल्हाध्यक्ष पंकज काटे संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष धनाजी शिव पालक रोहित एक मल्ली युवा नेते तसेच पां. स . सा. कारखान्याचे संचालक गंगाराम विभूते यांनीही आपले मनोगत व्यक्त केले .

याप्रसंगी गावचे मा. सरपंच राजाभाऊ माने, मा. ग्रा.पं. सदस्य दौलतराव ननवरे, मा. उपसरपंच मधुकर ननवरे, युवा उद्योजक गणेश पाटील , रमेश शेगांवकर तसेच मा. उपसरपंच विश्वास सुरवसे, जुलुस शेख , तसेच अनिल जाधव ,राहुल ताकतोडे ,राजेश काटे, गोरख काटे , सचिन ननवरे ,पत्रकार संजय ननवरे हे ही उपस्थित होते. तसेच कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिवाजी ननवरे, शहाजी ननवरे यांनी केले प्रास्ताविक मंगेश ननवरे, त्रिसरण पंचशिल नितीन ननवरे तसेच आभार प्रदर्शन सावता ननवरे यांनी केले.

You may have missed