पिरळे येथे येळकोट येळकोट जय मल्हार गाण्याचा लॉन्चिंग

पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क प्रमोद शिंदे

पिरळे तालुका माळशिरस येथे अकोट येळकोट जय मल्हार या रत्नाई प्रोडक्शन गोरख साळवे च्या ऑडिओ आणि व्हिडिओ गाण्याचे सोलापूर जिल्हा नियोजन समिती सदस्य राष्ट्रवादीचे नेते उत्तमराव जानकर तसेच काँग्रेस चे माजी रामहरी रुपनवर व मान्यवरांच्या हस्ते लॉंचिंग करण्यात आले.

या कार्यक्रमादरम्यान माजी आमदार रामहरी रुपनवर बोलताना म्हणाले की माणसाचे विचार चांगले असावे हे विचार साहित्य व गाण्याच्या माध्यमातून व्यक्त झाले पाहिजे चांगली माणसं चांगली त्याला कृती करतात दुसऱ्याला मोठा म्हणणारी माणसं नेहमी मोठे होत असतात राष्ट्रवादीचे नेते उत्तम जानकर म्हणाले प्रत्येकाने शिक्षित झाले छोट्याशा गावातील युवकाने गाणं लिहिण्याचा चांगला प्रयत्न केला आहे त्याच्या पाठीशी आपण सर्वांनी उभा राहिला पाहिजे

तसेच विकास दादा यांचे यांनी सुद्धा कार्यक्रमाला शुभेच्छा दिल्या व म्हणाले अहिल्यादेवींनी देशाला दिलेले योगदान न्यायदान आपणाला विसरून चालणार नाही तसेच सुभाष अण्णा पाटील व पोलीस पाटील औदुंबर बुधावले यांनीसुद्धा शुभेच्छा दिल्या तसेच सुभाष अण्णा पाटील यांचा ग्रामस्थांच्या वतीने विशेष सन्मान करण्यात आला

व शिवाजी लवटे पाटील यांची समता माध्यमिक विद्यालय चेअरमनपदी निवड झाल्याबद्दल उत्तमराव जानकर यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक शिवव्याख्याते अजित महाराज खंडागळे यांनी केले. यावेळी एन डी एम जे राज्य सचिव वैभव गीते  सोलापूर जिल्हा नियोजन समिती सदस्य सुरेश आबा पालवे उद्योजक जिल्हा परिषद सदस्य बाळासाहेब धाईंजे शरद मोरे पंचायत समिती सदस्य अजय सकट नवनाथ दडस राष्ट्रीय समाज पक्षाचे अण्णा रुपनर नितीन धायगुडे किरण भांगे मधुकर पाटील शंकर मिटकरी भाऊसाहेब पाटील तसेच अनेक मान्यवरांसह ग्रामस्थ व पदाधिकारी उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी माजी सरपंच ज्ञानदेव शिंदे  महादेव शिंदे शिवाजी लवटे दादा साहेब ठावरे गोरख साळवे कालिदास दडस बबन साळवे गणेश दडस

You may have missed