पिरळे-फोंडशिरस रस्ता देतोय मृत्यूला निमंत्रण,सार्वजनिक बांधकाम विभागाचा हलगर्जीपणा
पिरळे-फोंडशिरस रस्ता देतोय मृत्यूला निमंत्रण,सार्वजनिक बांधकाम विभागाचा हलगर्जीपणा

पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क प्रमोद शिंदे- पिरळे-फोंडशिरस रस्ता मृत्यूला निमंत्रण देत असल्याचं दिसून येत आहे.आणि याला जबाबदार फक्त सार्वजनिक बांधकाम विभागाचा हलगर्जीपणा दिसून येत आहे.पिरळे-फोंडशिरस हा प्रमुख रहदारीचा रस्ता असून या रस्त्याने वालचंद नगर, इंदापूर,बारामती,पुणे तसेच माळशिरस,अकलूज सांगोला कडे या रस्त्याने जाता येता येते हा रस्ता नेहमीच वर्दळीचा असून शॉर्टकट,नजीकचा रस्ता असल्याने सतत लोकांची ये-जा असते.

परंतु तो रस्ता मोठे खड्डे पडल्यामुळे सध्या धोकादायक बनला आहे. लोकांना प्रवास करताना खड्ड्यांचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे या खड्ड्यांमुळे सतत अपघात होत आहेत व या अपघातामुळे लोकांना इजा पोहोचत आहे भविष्यात या खड्ड्यांमुळे एखाद्या व्यक्तीच मृत्यू सुद्धा होऊ शकतो जर एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यास त्याला फक्त सार्वजनिक बांधकाम विभाग व संबंधित त्यांचे अधिकारी च जबाबदार असू शकतात. फोंडशिरस येथे प्राथमिक आरोग्य केंद्र आहे या प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार घेण्यासाठी व प्रसूतीसाठी गरोदर महिलांना जावे लागते खड्ड्यांमुळे त्यांना त्रास सहन करावा लागतो तसेच शाळेतील विद्यार्थी,शिक्षक, अंगणवाडी सेविका,आरोग्य सेविका यांना प्रवास करताना तारेवरची कसरत करावी लागते प्रसंगी अपघाताला सुद्धा समोर जावे लागत आहे.

दडस वस्ती नजीक जी.प शाळे जवळ सुमारे दोन दोन फुटाचे मोठे खड्डे पडले आहेत.या रस्त्यातील खड्डे व रस्ता दुरुस्त करण्यासाठी गावातील संघटना व अनेक ग्रामस्थांनी वेळोवेळी मागणी केली आहे.परंतु याकडे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी जाणून बुजून दुर्लक्ष केले जात आहे. दरवर्षी तात्पुरत्या स्वरूपात लाखो रुपयांचे रस्ते दुरुस्ती व खड्डे बुजवण्याचे टेंडर ठेकेदारांना दिले जाते. परंतु निकृष्ट दर्जाचे खड्डे बुजवले जातात व त्याची बिले काढली जातात. त्या बिलांची टक्केवारीत वाटाघाटी केली जाते.

त्यामुळे येथील रस्ते निकृष्ट दर्जाचे होतात.याकडे जाणून-बुजून संबंधित अधिकार्यांचे दुर्लक्ष केले जाते.या भागात सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी फिरकत सुद्धा नाहीत.कामाची बिले ऑफिसमध्येच बसून काढली जातात या निकृष्ट दर्जाच्या कामकाजा साठी केवळ आणि केवळ सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी असल्याचं बोलले जात आहे. या रस्त्याने विविध कार्यक्रमासाठी,प्रचारासाठी,उद्घाटनासाठी नेहमीच सर्वपक्षीय लोकप्रतिनिधी ये-जा करतात त्यांचेसुद्धा या रस्त्याकडे दुर्लक्ष असल्याचं दिसून येत आहे.तात्काळ रस्ते दुरुस्त करा अन्यथा आंदोलन करू असा इशारा पुरोगामी महाराष्ट्र व गणेश वाघमोडे मित्र मंडळाच्या वतीने करण्यात आला आहे.
https://youtu.be/b7-Wn-g6lgc
