शाखा अभियंता लाचलुचपतच्या जाळ्यात
शाखा अभियंता लाचलुचपतच्या जाळ्यात
पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क संगमनेर ( प्रतिनिधी ) संगमनेर पंचायत ठेकेदाराकडून १ ९ हजारांची लाच घेताना रंगेहात पकडले पंचायत समितीमध्ये ठेकेदाराकडून शाखा अभियंता १ ९ हजार रुपयांची लाच घेताना लाचलुचपत विभागच्या जाळ्यात अलगद अडकला .

ही कारवाई सोमवार दि . २३ मे २०२२ रोजी दुपारी २ वाजण्याच्या सुमारास करण्यात आली . संजय गोविंदराव ढवण ( रा . श्रीरामपुर ) या अभियंत्याला नाशिक लाचलुचपत विभागाने बेड्या ठोकल्या आहेत . याप्रकरणी संगमनेर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे . येथे एका ठेकेदाराने तीन लाख रुपयांचे रस्त्याचे काम घेतले होते .

ठेकेदाराने कामाला लागणारी सर्व प्रक्रिया केली . त्याची परवानगी व कामाची पाहणीसाठी लाचखोर शाखा अभियंता संजय ढवण यांनी वारंवार टाळाटाळ केली . त्यांनी परवानगी मिळण्यासाठी व पाहणीसाठी ठेकेदाराकडे ५ % कमिशनने १५ हजार तर क्वालिटी कंट्रोल अधिकाऱ्यांचे ४ % कमिशनने ४ हजार असे १ ९ हजार रुपयांची मागणी केली . मात्र , ठेके दाराने चिंचोली गुरव मध्ये जे काम करायचे आहे त्याचे सर्व डिपॉझीट भरले होते व कामही पूर्ण केले होते .

आता पैसे कशासाठी द्यायचे ? मात्र , शाखा अभियंत्याने तपासणीच्या नावाखालील तक्रारदाराकडे १ ९ हजार रुपयांची मागणी केली . मात्र , तक्रारदार अभियंत्याच्या बारंवार मागणीला कंटाळून थेट नाशिक लाचलुचपत विभागाकडे तक्रार केली . नाशिकचे लाचलुचपत विभागाचे आयुक्त सुनील कडासण याच्या मार्गदर्शनाखाली वरीष्ठ पो.नि. मिरा आदमाणे , पो . ना . प्रविण महाजन , नितीन कराड , प्रभाकर गवळी , संतोष गांगुर्डे यांच्या पथकाने केली . संगमनेर शहरातच २०१६ साली तहसिलदारांच्या वरीष्ठ लिपीकाला लाचलुचपत विभागाने लाच घेताना रंगेहात पकडले होते . या प्रकरणाचा निकाल नुकताच लागला असून या वरीष्ठ लिपीकाला चार वर्षांची शिक्षा झाली आहे . हे प्रकरण ताजे असतानाचा आज पुन्हा एकदा संगमनेरात लाचलुचपत विभागाने थेट पंचायत समितीमध्ये सापळा रचून जेरबंद केले आहे . याबाबत समजले ली माहिती अशी की , तालुक्यातील चिंचोली गुरव दरम्यान , तक्रादार हे त्यांच्या मतावर ठाम होते . त्यामुळे नाशिक लाचलुचपत विभागाने पंचायत समिती मध्ये सापळा रचला . तक्रार दाराकडुन शाखा अभियंता संजय ढवण यांनी १ ९ हजार रुपये घेत असताना लाचलुचपत विभागाने रंगेहात पकडले . वरीष्ठ अधिकारी जेरबंद झाल्याने इतर अधिकारी कर्मचाऱ्यांची पळापळ झाली . ताब्यात घेतलेल्या ढवण यांना शहर पोलीस ठाण्यात आणून त्यांची चौकशी सुरु करण्यात आली आहे . https://youtu.be/Q_c8NHH87Kc