पिरळेत राजमाता अहिल्यादेवी होळकर जयंती उत्साहात

पिरळेत राजमाता अहिल्यादेवी होळकर जयंती उत्साहात

पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क नातेपुते प्रतिनिधी

पिरळे ता माळशिरस जिल्हा सोलापूर येथे पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांची 297 वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. मान्यवरांच्या हस्ते सकाळी राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.तसेच हलगी,ढोल च्या तालावर पारंपारिक गजी खेळ खेळण्यात आला.

जयंती निमित्ताने महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते तसेच राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेची भंडारा उधळत रथा मधून भव्य दिव्य मिरवणूक काढण्यात आली कार्यक्रमाचे आयोजन राज ioमाता अहिल्यादेवी होळकर जयंती उत्सव समितीच्या वतीने करण्यात आले होते.

You may have missed