मी आंबेडकरवादी संघटनेच्या वतीने दलित पॅंथरच्या 50 व्या वर्धापन दिनानिमित्त पॅंथरचा सन्मान

मी आंबेडकरवादी संघटनेच्या वतीने दलित पॅंथरच्या 50 व्या वर्धापन दिनानिमित्त पॅंथरचा सन्मान
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क प्रमोद शिंदे नातेपुते (प्रतिनिधी)

जंक्शन येथे मी आंबेडकरवादी सामाजिक संघटना महाराष्ट्र राज्य सुरज वनसाळे यांच्या वतीने दलित पॅंथरच्या पन्नासाव्या वर्धापन दिनानिमित्त पॅंथरचा सन्मान व महामेळावा आयोजित करण्यात आला होता.या सन्मान सोहळ्यास महाराष्ट्रातील दिग्गज मान्यवरांना निमंत्रण देण्यात आले होते. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी दलित पॅंथर चे आक्रमक नेते मा. खासदार प्राध्यापक जोगेंद्र कवाडे सर हे होते. प्रमुख पाहुणे म्हणून पॅंथर आंबेडकरी चळवळीचे नेते दादासाहेब धांडोरे,विकास दादा,धाईंजे एन डी एम जे चे राज्यसचिव वैभवजी गीते पँथर सेनेचे अध्यक्ष दीपक केदार सुभाष साबळे, वाघमारे व इतर मान्यवर होते.

कार्यक्रमाची सुरुवात डॉ बाबासाहेब आंबेडकर व संविधान प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली.सुरज वानसाळे मित्रपरिवार यांच्या वतीने सर्व पॅंथरचा सन्मान करण्यात आला.यावेळी पीपल्स रिपब्लिकन पक्षाचे संस्थापक अध्यक्ष प्रा.जोगेंद्र कवाडे सर बोलताना म्हणाले पॅंथरने आम्हाला प्रतिकार करण्याची शक्ती दिली आहे. सत्तेसाठी लाचार होऊ नका सर्वांनी एकत्र या.तोरणात आणि मरणात आम्ही एकत्र येतो पण ऐक्याच्या मांडवात एकत्र येत नाही त्याचं कारण अहंकार आहे नेत्यांनी अहंकार बाजूला ठेवला पाहिजे.आपल्या मुलांवर संस्कार करा इतिहास सांगा सध्या संविधान धोक्यात आहे संविधान वाचवण्याचं काम आपण केलं पाहिजे. राज्यसचिव वैभव गीते बोलताना म्हणाले नुसत्या भाषणाने न्याय मिळणार नाही. कार्यकर्ता कायदेशीर प्रशिक्षित झाला पाहिजे समाजाला प्रगती च्या दिशेने नेले पाहिजे. नेत्यांनी अत्याचार पिढीत कुटुंबाकडे पाहिले पाहिजे. तसेच त्यांचे पुनर्वसन करून त्यांना न्याय मिळवून दिला पाहिजे. त्यासाठी प्राण गेले तरी हरकत नाही. 2012 पासून 632 खून महाराष्ट्रात झाले आहेत. त्या सर्वांचे पुनर्वसन केल्याशिवाय स्वस्त बसणार नाही अन्यथा स्वतः गोळी झाडून घेईन.कार्यकर्त्यांना स्वतःच्या पायावर उभा करीन.तसेच त्यांनी बजेटचा कायदा झाला पाहिजे कॉन्टिजन्सी प्लॅन लागू करा.वामनदादा कर्डक यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या नावाने कलाकारांना पुरस्कार द्या.दादासाहेब सबलीकरण योजनेत बागायत जमीन घेण्यासाठी सोळा लाख तर जिराईत जमीन घेण्यासाठी बारा लाख रुपये लाभार्थ्यांना द्या.अशाप्रकारे त्यांनी मागणी केली आहे.

तसेच प्रा.अरुण कांबळे,पॅंथर सेनेचे दीपक केदार यांनी उपस्थितांना आपल्या शैलीत मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मी आंबेडकरवादी सामाजिक संघटनेच्या अध्यक्ष सुरज वनसाळे यांनी तर सूत्रसंचालन विशाल साळवे यांनी केले. यावेळी महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध गायक शाहीर यांचा भारदस्त भीम गीतांचा जलसा सादर करण्यात आला. या कार्यक्रमास विक्रम शेलार ,शाहीर राजेंद्र कांबळे ,विजय सरतापे विनायक लोंढे आतिश मिसाळ यांच्यासह महाराष्ट्रातील विविध ठिकाणचे प्रसिद्ध गायक मोठ्या संख्येने कार्यकर्ते व महिला उपस्थित होत्या.कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी मी आंबेडकरवादी संघटनेतील पदाधिकारी यांनी परिश्रम घेतले.

You may have missed