जि.प. पिरळे शाळेत रंगला विद्यार्थी विठ्ठल भक्तांचा दिंडी सोहळा


पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क प्रमोद शिंदे –जि प शाळा पिरळे येथे सालाबाद प्रमाणे आषाढी एकादशीनिमित्त विद्यार्थी विठ्ठल भक्तांचा दिंडी सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला. या दिंडी सोहळ्यात ज्ञानोबा तुकाराम माऊली माऊली नामाचा गजर झाला. दिंडीची सुरुवात शाळेच्या प्राणांगणात हरिपाठ घेऊन सुरू करण्यात आली विठू माऊलीच्या गजर करत गावप्रदर्शना करून सोहळा रंगला तसेच माऊली माऊली म्हणून रिंगण सोहळा सुद्धा पार पडला दिंडी सोहळ्यात विद्यार्थ्यांनी हुबेहूब विठ्ठल-रुक्मणी, ज्ञानेश्वर महाराज, छत्रपती बाल शिवाजी महाराज, वासुदेव,चोपदार अशा अनेक वेशभूषा केल्या होत्या त्याच्या हातात भगवी पताका ,टाळ,कपाळी गंध बुक्का लावून विद्यार्थ्यांनी दिंडीचा आनंद घेतला. या दिंडीमध्ये अंगणवाडी मधील चिमुकल्या विद्यार्थ्यांनी सुद्धा सहभाग घेतला होता. या विद्यार्थ्यांमुळे थोड्यावेळासाठी गावांमध्ये भक्तीमय वातावरण निर्माण झाले होते. हा दिंडी सोहळा जि.प.शाळेचे शंकर शिंगाडे सर यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला. दिंडी सोहळा यशस्वी होण्यासाठी संजय ढवळे सर,खरात सर, निगडे सर, मुलाणी सर, शेंडगे मॅडम, मुल्ला मॅडम,नामदेव मॅडम,अंगणवाडीच्या सूर्यवंशी मॅडम,आत्तार मॅडम, कांबळे मॅडम यांनी परिश्रम घेतले.

You may have missed