डॉ.केवल उके यांच्या प्रयत्नाने कॅन्सर ग्रस्त पालक असणाऱ्या गरीब विद्यार्थ्यांस शालेय साहित्याचे वाटप


पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क कल्याण संदेश भालेराव

बुद्धभूमी फाउंडेशन कल्याण येथे डॉ केवल उके यांच्या प्रयत्नाने गरीब व गरजू विद्यार्थ्यास साहित्याचे वाटप करण्यात आले. वर्षावास तसेच गुरुपौर्णिमेचे औचित्य साधून बुध्दभूमी फाऊंडेशन कल्याण येथे महावितरण कंपनी कल्यान परिमंडळ दोनचे अधिक्षक अभियंता मा.दिलीप भोळे यांनी कु.संघर्ष विजय शिंदे या गरजू विद्यार्थ्यांस वर्षभर पुरेल येवढे शिक्षणास लागणारे साहित्य यामध्ये वह्या पेन शालेय गणवेश, बुट, दप्तर सर्व शालेय साहित्य भेट दिले. कल्याण पश्चिमेच्या शिशु विहार प्राथमीक व माध्यमिक विद्यालयातील इयत्ता सहावी मध्ये शिकत असलेला विद्यार्थी कु.संघर्ष शिंदे याच्या वडीलास कॅन्सर झाल्यामुळे शिक्षणात अनेक अडचणी येत असल्याचे  एन.डी.एम.जे. राज्य महासचिव मा.अ‍ॅड.डाॅ.केवलजी उके यांच्या निदर्शनास आले होते.

सदर बाब कल्याण महावितरण परिमंडळाचे अधिक्षक अभियंता मा.दिलीप भोळे यांच्याशी चर्चा केली असता तत्काळ त्या विद्यार्थ्यास शैक्षणिक मदत करून क्षणासाठी दत्तक घेण्यात आले  आणि वर्षभर सदर मुलाचे शैक्षणिक खर्च व सर्व साहित्य पुरविण्याचे आश्वासन दिले. याप्रसंगी विद्यार्थ्याची आई विजया शिंदे यांच्या डोळ्यात अश्रू आले.अशोक नगर वालधुनी कल्याण येथील बुध्दभूमी फाऊंडेशनच्या बुध्द विहारात गुरुपौर्णिमेचा कार्यक्रम घेण्यात आला होता. यावेळी सर्व प्रथम तथागत भगवान गौतम बुद्धां व डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.कार्यक्रमास प्रमुख पाहुणे .डी.आर.पाटील (अभियंता), नितीन काळे (कार्यकारीअभियंता), शशिकांत पवार (अभियंता),  उपस्थिती होते . तसेच पुरोगामी महाराष्ट्र न्यूज चे संचालक तथा एन डी एम जे चे राज्य सचिव यांच्या वतीने गरजू महाराष्ट्रभरातील विद्यार्थ्यांना महापुरुषांच्या जयंती तसेच वाढदिवस विविध कार्यक्रमाचे औचित्य साधून  विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य दिले जाते व इतरांनाही विद्यार्थ्यांना मदत करण्याचे आव्हान केले जाते. या आव्हानास प्रतिसाद देत सामाजिक जबाबदारी म्हणून त्यांनी सुद्धा येणाऱ्या काळात अशा प्रकारच्या काही गरीब, गरजू आणि होतकरू विद्यार्थ्यांना मदत करण्याचे आश्वासन दिले.यावेळी यसदा संस्थेचे सचिव शशिकांत खंडागळे, एन.डी.एम.जे.संघटनेचे ठाणे जिल्हाध्यक्ष विजय कांबळे, कल्यान डोंबिवली शहराध्यक्ष ॲड.प्रविण बोदडे, ठाणे जिल्हा प्रसिद्धीप्रमुख संदेश भालेराव, उमेश देवरे, रवींद्र रोकडे इत्यादीसह स्थानिक भंते आणि बौद्धउपासक विद्यार्थी उपस्थित होते. 

You may have missed