पिरळे जि.प.शाळेत तळीरामांचा हैधुस पोलीस प्रशासनाचे दुर्लक्ष


पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क नातेपुते (प्रतिनिधी)

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पिरळे येथील शाळेच्या वरंड्यामध्ये व परिसरात तळीरामांनी पुन्हा हैधुस घालण्यास सुरुवात केली आहे. जि प शाळा ही तालुक्यामध्ये नावाजलेली शाळा असून शाळेची पटसंख्या सुमारे अडीचशे आहे. शिक्षक वर्ग आठ पेक्षाा जास्त आहेत.गुणवत्ता ही चांगली आहे. परंतु या शाळेच्या आवारामध्ये रोज संध्याकाळी परिसरातील तळीराम दारूच्या बाटल्या घेेऊन तळ ठोकतात व दारू पिऊन झाल्यानंतर त्याच ठिकाणी रिकाम्या बाटल्याा, ग्लास,फुगे,प्लास्टिक च्या पिशव्या चकण्यासाठी आणलेली साहित्य त्याच ठिकाणी टाकून जातात.शाळेच्या आवारात शौचास लघवीसाठी बसतात.
सकाळी शाळाा भरल्यानंतर विद्यार्थीथी शाळेच्या वरंड्यााात व परिसरात आल्यानंतर त्यांना हे दृश्य दिसते व काही नाबालक विद्यार्थी त्या वस्तूंना हात लावतात खाली पडलेला चकना शेंगदाणे वगैरे खाण्याचा प्रयत्न करतात. त्यामुुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होत आहे. यामुळे शाळेच्या परिसरात दुर्गंधी पसरत आहे.त्याकडे पोलीस प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याचं दिसत आहे. अनेकदा पोलिसांनी कारवाई करून सुद्धा हेे तळीराम या ठिकाणी येतात या तळीरामांचा कायमचा बंदोबस्त करण्याची मागणी मुख्याध्यापक तसेच शालेय शिक्षण समिती यांनी केली आहे.

या अगोदर नातेपुतेेे पोलीस स्टेशनचे कर्तव्यदक्ष पोलीस अधिकारी ए पी आय मनोज सोनवलकर यांनी दारू विक्रेते व तळीराम यांना गावामध्ये दारू नविकण्याच्या सूचना दिल्या होत्य तरीसुद्धा त्या सूचनांचे पालन नकरता येथील दारू विक्रेते राजरोसपणे दारू विक्री करतात.अनेकदा ग्रामपंचायतीकडून सुद्धा दारूबंदी संदर्भात ठराव व तरुणांकडून निवेदन देण्यात आले आहेत. दारुमुळ येथील तरुण पिढी व्यसनाधीन होत चालली आहे. काही लोकांना दारुमुळे प्राण ही गमवावे लागले आहेत.या गंभीर बावीकडे पोलीस प्रशासन लक्ष देणार का? हा प्रश्न उपस्थित झाला आहे.

You may have missed