नातेपुते परिक्षेत्रात मका शेतीशाळा क्षेत्र दिन संपन्न !!

मका शेतीशाळा क्षेत्र दिन संपन्न !!

पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क प्रमोद शिंदे

यश लाईफस्टाईल मधील दिवाळी धमाका ऑफर T.Vविजेते

महाराष्ट्र शासन कृषि विभाग मंडळ कृषि अधिकारी नातेपुते कार्यक्षेत्रातील मौजे एकाशीव तांबेवाडी येथे किड व रोग सव्हेक्षण सल्ला मार्गदर्शन प्रकल्पाअंतर्गत या पंचक्रोशीतील ३० कमी जास्त लाभार्थीना वर्ग क.१ शेतकरी निवड मका पिक माहिती ‘ २ – बियाणे वाण निवड ३ – मका बीज प्रक्रिया ४ – एकात्मिक अन्नद्रव्ये व्यवस्थापन व पाणी ५ – एकात्मिक कीड व रोग निमंत्रण व तन नियंत्रण६ – सुक्ष्म अन्नद्रव्ये व्यवस्थापन व काढणी या विषयावरील माहिती मार्गदशन करण्यात आले . शेतीशाळेचा सांगता व शेवटचा वर्ग क्र ८ ला क्षेत्र दिन कार्यक्रमांचे आयोजन १८ ऑक्टोबर रोजी महालक्ष्मी मंदीर तांबेवाडी येथे कृषि विज्ञान केंद्र मोहोळ विषय तज्ञ सौ काजल जाधव – माहत्रे यांच्या मका व मुल्यवर्धन .श्री सतिश कचरे मंडळ कृषि अधिकारी नातेपुते तथा प्र तालुका कृषि अधिकारी माळशिरस यांनी रब्बी हंगाम गव्हू ‘ हरभरा ‘मका ‘ऊस जैविक बीज प्रक्रियाचे महत्व विषद केले व श्री दत्तात्राय पांढरमिसे यांनी पीएम – किसान मानधन केवाशी व पीएम किसान किसान क्रेडीट कार्ड बाबत माहिती दिली व २२ मानधन शेतकरी यांचे फॉर्म भरून घेतले . मका व प्रधानमंत्री सुक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग संधी व वाव बाबत श्री गोरख पांढरे कृषि पर्यवेक्षक यांनी माहिती दिली. या कार्यक्रमांत कृषि विज्ञान केंद्र मोहोळ अर्थसहायीत पी.एस.बी वी अँझटोबैक्टर यांची ज्वारी बियाणे बीज प्रक्रिया सौ काजल जाधव – महात्रे यांनी प्रत्यक्ष बीज प्रक्रिया प्रात्यक्षिक करून दाखविले व ज्वारी च्या १५ लाभार्थीना ४किलो अँझटोबॅक्टर व पी.एस.बी मोफत प्रात्यक्षीकसाठी वाटप करण्यात आले . तांबेवाडी उपसरपंच श्री तुषार भोईटे यांनी शेतीशाळा वर्गाचा मागोवा घेऊन यामुळे शेतकरी वर्गाला फायदा झाले चे प्रकर्षाने नमुद केले व ३० प्रशिक्षणार्थी गावातील इतर शेतकरी बांधवांना मिळालेल्या ज्ञानाचा प्रसार करणेबाबत हमी दिली व उपस्थिताचे आभार माणले . या कार्यकमांस एकाशिव सोसायटी चेअरमन श्री संजय रुपनवर व श्री राजेन्द्र तांबे महालक्ष्मी शेतकरी गट अध्यक्षही उपस्थित घेते तसेच श्री एन एस गोरे व श्री. व्ही डी दूधाळ उपस्थितीत राहून कार्यकम नियोजन व आयोजनास मदत केली . कार्यक्रमांचे सुत्रसंचालन श्री आर डी नाळे कृषी सहायक यांनी केले व चहापान ने सांगता झाली .

You may have missed