स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त एन डी एम जे च्या वतीने कोथळेत राज्यस्तरीय पतंग महोत्सव उत्साहात संपन्न

पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क नातेपुते (प्रतिनिधी)-

स्वातंत्र्याच्या 75 व्या अमृत महोत्सवानिमित्त एन डी एम जे या सामाजिक संघटनेच्या वतीने  मुंगी घाट कोथळे ता माळशिरस येथे पतंग महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. हा पतंग महोत्सव एन डी एम जे चे राज्य सचिव वैभव गीते यांच्या नेतृत्वात आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाचे उद्घाटन अंध विद्यार्थी जीवन तात्या धांडोरे यांच्या हस्ते करण्यात आले. पतंग महोत्सामध्ये स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव,बौद्ध,अनुसूचित जाती जमातीचा निधी इतरत्र वळवू नये बजेटचा कायदा करावा म्हणून, तसेच बेटी पढाव बेटी बचाव पर्यावरणासंदर्भाचे व सामाजिक संदेश पतंगा वरती लिहून पारंपारीक हलगी,डॉल्बी-डीजे च्या तालावर या पतंगी उंच आकाशात सोडण्यात आल्या.तसेच या ठिकाणी कार्यकर्त्यांसाठी विविध गुणदर्शनाचा कार्यक्रम घेण्यात आला पंढरपूर भंडी शेगाव येथील विद्यार्थ्याने लेझीम नृत्य सादर केले तसेच  सुप्रसिद्ध दंगलकार कवी नितीन चंदनशिवे यांनी आपल्या शैलीत कविता सादर केल्या. नूतन नायब तहसीलदार पदी नियुक्ती झालेले प्रतीक आढाव यांचा जल्लोषात स्वागत करण्यात आले. या कार्यक्रमास पुणे, रायगड, ठाणे,मुंबई,कोकण,उस्मानाबाद,बीड,हिंगोली,सातारा, सांगली,सोलापूर,लातूर महाराष्ट्रातील सुमारे दीड हजार कार्यकर्ते सहभागी झाले होते. कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून नॅशनल दलित मोमेंट फॉर जस्टिसचे राज्याचे महासचिव ऍड.डॉ केवल उके आंबेडकरी चळवळीचे नेते विकास दादा धाईंजे,माजी  विशेष सरकारी वकील बी.जी बनसोडे, उद्योजक विनोद जाधव,ऍड सुमित सावंत,ऍड वैभव धाइंजे,ऍड.बापूसाहेब शिलवंत,बोधिसत्व माने तसेच एन डी एम जे चे सर्व पदाधिकारी चळवळीतील कार्यकर्ते सह पत्नी मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रम. यशस्वी होण्यासाठी माळशिरस तालुक्यातील कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.

You may have missed