*चंद्रप्रभू इंग्लिश मीडियम मध्ये स्नेहसंमेलन व बक्षीस वितरण सोहळा पन्ना

* नातेपुते (प्रमोद शिंदे)- चंद्रप्रभू एज्युकेशन सोसायटी संचलित चंद्रप्रभू इंग्लिश मीडियम स्कूल नातेपुते येथे स्पंदन 2020 या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात वार्षिक स्नेहसंमेलन व विविध क्षेत्रात प्राविण्य मिळवलेल्या विद्यार्थ्यांसाठी बक्षीस वितरण सोहळा घेण्यात आला होता. या सोहळ्याचे उद्घाटन माळशिरस विधानसभेचे आमदार राम सातपुते, सोलापूर जिल्हा परिषद चे माजी उपाध्यक्ष बाबाराजे देशमुख, कृषी उत्पन्न बाजार समिती  उपसभापती मामासाहेब पांढरे, पं.स.माजी उपसभापती किशोर सुळ व मान्यवरांच्या हस्ते  करण्यात आले.प्रथम प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली आमदार सातपुते व मान्यवरांचा सन्मान संस्थेचे अध्यक्ष  नरेंद्र गांधी यांच्या वतीने करण्यात आला आमदार राम सातपुते बोलताना म्हणाले की ग्रामीण भागात स्वखर्चातून अशा प्रकारची शाळा चालवणे म्हणजे गर्वा ची गोष्ट आहे शेतकऱ्यांची मुले इंग्लिश माध्यमातून शिकली पाहिजे यासाठी परिश्रम घेणाऱ्या शिक्षकां चे धन्यवाद मानायला हवेत 90 % पेक्षा जास्त गुण मिळवणारे या शाळेमध्ये आहेत तसेच बाबाराजे देशमुख बोलताना म्हणाले की अतिशय गुणात्मक व उत्कृष्ट अशी शाळा येथील शिक्षकांनी केली आहे तसेच पुढील वाटचालीस शाळेला शुभेच्छा दिल्या.या कार्यक्रमास आमदार राम सातपुते,बाबाराजे देशमुख,मामासाहेब पांढरे,किशोर सुळ संस्थेचे चेअरमन नरेंद्र भाई गांधी,बाहूबलीसेठ शंकेश्वर, सेक्रेटरी बबलू दावडा,सागर गांधी, वर्धमान दोशी,वीरेंद्र दावडा,महाविर मेहता, संजय गांधी, इंजिनीयर गडकरी तसेच प्राचार्य मुल्लासर,शिक्षक,स्टाफ,विद्यार्थी-पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे प्रास्ताविक चेअरमन नरेंद्र गांधी यांनी केले.

You may have missed