न्याय सहाय्यक विज्ञान संस्थेचे सात दिवसीय निवासी शिबिर यशस्वीरित्या पूर्ण


पुरोगामी महाराष्ट्र नेटवर्क (मुंबई) दरवर्षीप्रमाणे याही वर्षी देखील न्याय सहाय्यक विज्ञान संस्था मुंबई येथील एन एस एस तर्फे सात दिवसाच्या विशेष निवासी शिबिराचे आयोजन पँराडाईम फॉर्म हाऊस गोंडले तालुका सुधागड पाली जिल्हा रायगड येथे करण्यात आले होते.
एन एस एसचे एकूण 30 विद्यार्थी आणि कार्यक्रम अधिकारी डाँ.केवल उके यांनी दरवर्षी प्रमाणे अनेक कार्यक्रम राबविले जसे ग्रामीण स्वच्छता अभियान आरोग्य पर्यावरण संवर्धन वृक्षारोपण शिक्षण प्रचार आणि प्रसार अंधश्रद्धा निर्मूलन विद्यार्थी विकास सार्वजनिक वाचनालयाची स्थापना वनराई बंधारा बांधकाम सायबर सिक्युरिटी अवेरनेस प्रोग्राम निविध पथनाट्य व्यसनमुक्ती लसिकरण जागृकता इ.विद्यार्थ्यानी नांदगाव येथे वनराई बंधारा बाधला कृषी अधिकारी श्री गजानन अाव्हाल यांच्या मार्गदर्शनाने 300 गोणी रेती आणि माती भरून विद्यार्थ्यांनी हा बंधारा पूर्ण केला. सर्व विद्यार्थ्यांनी आणि कार्यक्रम अधिकारी डॉ केवळ उके यांनी जीवतोड मेहनत करून हा बंधारा बांधला. गायी गुरांसाठी गावातील लोकांसाठी पाणी साठवून रहावे आणि पावसाळ्यातील पाणी साठविण्यास मदत हवी या उद्देशाने हा बंधारा बांधण्यात आला.
आरोग्य संबंधित विचार करता न्यायसहाय्यक विज्ञान संस्थेच्या विद्यार्थ्यांनी मोलाचे पाऊल उचलले गर्भवती महिलांसाठी आवश्यक माहिती गोवर रूबेला वर उपाय लसिकरणाबंध्दल माहिती दिली आणि महत्वाचे म्हणजे टिबी यासारख्या आजारावर उपाय आणि त्यांची माहिती पथनाट्यद्वारे देऊन मोठ्या प्रमाणात जनजागृती केली नांदगाव येथे सर्वे करून माहिती गोळा केली आणि त्यावर अंमलबजावणी करण्यासाठी प्राथमिक आरोग्य सेवा केंद्राशी संपर्क साधला. सार्वजनिक ठिकाणी माहितीपुस्तिका वाटणे पथनाट्य संभाषणाव्दारे विद्यार्थ्यांनी लोकांना जागृत करण्याचा प्रयत्न केला.
आणि लोकांपर्यंत माहिती पोचवण्याचा प्रयत्न केला. हे सर्व कार्यक्रम पार पाडण्यासाठी विशेष सहकार्य म्हणजे प्राथमिक आरोग्य सेवा केंद्राचे वैद्यकीय अधिकारी साहिली मानकर आरोग्य सहाय्यक सौ स्वप्नजा देशमुख आरोग्य सहाय्यक श्री यशवंत वारगुडे विभागीय पर्यवेक्षक महेश भोसले आणि सुधागड तालुक्यातील सर्व आशा सेविका विद्यार्थ्यांनी नांदगाव पाली गोंडाले बावळोली भार्जेवाडी कातकरवाडी दांडवाडी दिघे दिघेवाडी इ. गावात सार्वजनिक कार्यक्रम केले. पालीममध्ये टॉपवर्थ इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये सायबर सिक्युरिटी आणि जनरल हायजिन या विषयावर माहिती दिली. नांदगाव येथे सर्वे करण्यात आला स्वस्त आहात तर मस्त आहात सौ साक्षी वैशमपयन यांच्या मार्गदर्शनाने हा सर्वे करण्यात आला. मॅडमनी विद्यार्थ्यांना हवी ती मदत केली आणि हा सर्वे यशस्वीरित्या पूर्ण केला. अशाप्रकारे न्याय सहाय्यक विज्ञान संस्था मुंबई येथील एन एस एसच्या विद्यार्थ्यांनी गावागावात जाऊन जनजागृती करण्याचा प्रयत्न केला. त्यांचे हे कार्य गावकऱ्यांसाठी चर्चेचा विषय बनला आहे याचे पुर्ण श्रेय या विद्यार्थ्यांना आणि त्यांचे कार्यक्रम अधिकारी डाँ.केवल उके यांना जाते. तसेच एन एस एसचे प्रतिनिधी आकांक्षा कुमारी शंतनु गडाले व ओमराजे पाटील यांनी देखील या कार्यात मोलाचे योगदान दिले

You may have missed