*पुन्हा एकदा खर्डा रक्ताने माखला* *खर्डा नितीन आगे खून प्रकरणातील मुख्यआरोपी रोहित गोलेकरसह इतरांनी दगडाने ठेचून आदिवासी मुलाचा केला खून*
पुरोगामी महाराष्ट्र न्यूज( प्रमोद शिंदे)- अहमदनगर जिल्हय़ात खर्डा येथील एका पारधी इसमाचा दगडाने ठेचून निर्घृण हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. बाळू बजरंग पवार (वय- 40, रा. कोष्टी गल्ली, खर्डा, ता.जामखेड) असे मृत इसमाचे नाव आहे. या घटनेमुळे जामखेड तालुक्यातील खर्डा गावात तणाव परसला आहे. या प्रकरणी सुधीर बाळू वाळस्कर, आकाश बाळू वाळस्कर, योगेश बलभीम वाळस्कर, रोहित उर्फ बबलू बाळासाहेब गोलेकर, गौतम राहुल तादगे (सर्व रा. खर्डा, ता. जामखेड) या पाच जणांविरोधात भादवि कलम 302, 34, 504, 506 ,तसेच ॲट्रॉसिटी ॲक्ट प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मृत बाळू पवारची मावशी वेणुबाई बाजीराव काळे यांनी याप्रकरणी जामखेड पोलीसात फिर्याद दिली आहे. सदर फिर्यादीत बाळू बजरंग पवार वय 40 याचे पैसे आरोपींकडे असल्याकारणाने मयत बाळू पवार याने घरी जाऊन पैसे मागितले म्हणून याचा राग मनात धरून आरोपीने दिनांक 29 ऑक्टोबर 2019 रोजी सायंकाळी सात वाजता च्या दरम्यान बाळूच्या घरी जाऊन घरासमोर डोक्यात दगडाने व लाथाबुक्क्यांनी मारहाण करून जखमी केले बाळू यास उपचाराला बार्शी येथे नेले असता उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. सर्व आरोपींना अटक करेपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नसल्याचा पवित्रा नातेवाईकांनी घेतला होता. तसेच खर्डा बंदचे आवाहन करण्यात आले आहे. खर्डा येथे वातावरण तणावपूर्ण असून अनुचित प्रकार घडू नये म्हणून ट्रॅकींग फोर्स, राज्य राखीव पोलीस दल खर्डा येथे दाखल करण्यात आले आहे. तसेच या घटनेतील आकाश बाळू वाळस्कार योगेश बिभीषण वाळस्कर या दोघांना अटक केली आहे सदर घटनेचा तपास एपीआय चव्हाण करत आहेत.२०१४ मध्ये अहमदनगरच्या जामखेड येथील खर्डा गावातील नितीन आगे यांच्या खुनातील प्रकरणात मुख्य आरोपी रोहित गोलेकर यांचे नाव असून त्याने आणि इतर चार साथीदार सोबत घेऊन असाच नितीन आगे यांचा खून केला होता, नितीन आगे खून प्रकरणाने धक्का बसला होता. उच्च जातीतील मुलीशी प्रेमसंबंध असल्याच्या संशयावरून, त्याची २८ एप्रिल २०१४ रोजी निर्घृणपणे हत्या करण्यात आली. झाडावर त्याचा मृतदेह गळफास घेतल्याप्रमाणे लटकवला. घटनेचे पडसाद राज्यभर उमटल्यानंतर पोलिसांनी मुलीच्या भावासह नऊ जणांवर हत्या, अॅट्रोसिटी अॅक्टअंतर्गत गुन्हा नोंदविला होता. मात्र पुरावे कमी पडले आणि साक्ष फुटल्यामुळे खटल्यातील आरोपी सुटले होते. सदर खटल्याचे पुन्हा चौकशीचे आदेश शासनाने दिले आहेत.