पिरळे येथे सतीश तात्या ढेकळे चषक क्रिकेट स्पर्धेचे आयोजन

पिरळे येथे सतीश तात्या ढेकळे चषक क्रिकेट स्पर्धेचे आयोजन
 पुरोगामी महाराष्ट्र नेटवर्क प्रमोद शिंदे-पिरळे येथे सतीश तात्या ढेकळे चषक क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे या स्पर्धेचे उद्घाटन उद्योजक सतीश तात्या ढेकळे उद्योजक संदीप तात्या नरोळे तसेच मान्यवरांच्या यांच्या हस्ते करण्यात आले. उद्घाटन प्रसंगी निकेतन साळवे,शंकर जानकर,संदीप वाघसर पत्रकार प्रमोद शिंदे व पंचक्रोशीतील खेळाडू मोठ्या संख्येने उपस्थित होते.क्रिकेट प्रेमींना प्रोत्साहन म्हणून या स्पर्धेसाठी प्रथम द्वितीय तृतीय असे 21000 रुपये बक्षीस व तिन्ही चषक उद्योजक सतीश तात्या ढेकळे यांच्या वतीने देण्यात आले  तसेच आकाश खिलारे,समाधान खिलारे,अनिल दडस,गणेश माने,उमेश जाधव ,निकम बंधू विष्णू नारायण क्रिकेट क्लब पिरळे मधील सर्व खेळाडूंनी या स्पर्धेचे आयोजन केले आहे.मान्यवरांनी खेळाडूंना या स्पर्धेसाठी व  दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या.

You may have missed