मोबाईलचा दुरुपयोग थांबवा: डॉ. समीर दोशी
पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क मांडवे:
स्वातंत्र्यप्राप्तीनंतर देशाने संविधानाचा स्वीकार करून लोकशाहीतील एका नव्या पर्वाची सुरुवात केली होती तो दिवस प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा केला जातो. रविवार दिनांक 26 जानेवारी रोजी हा दिवस रत्नत्रय इंग्लिश मेडिअम स्कूल व कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये उत्स्फूर्तपणे साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाची सुरुवात संविधान उद्देशिकेचे वाचन करून करण्यात आली.
यानंतर अकलूजचे सुप्रसिद्ध डॉ. मा. श्री समीर अशोककुमार दोशी व सौ. वैशाली समीर दोशी यांच्या शुभहस्ते ध्वजारोहण करण्यात आले.नंतर राष्ट्रगीत, ध्वजगीत,देशभक्तीपरगीत सादर करण्यात आले. त्यानंतर ढोल तशाच्या तालावर संगितमय ,आकर्षक अशी विद्यार्थ्यांनी कवायत सादर केली . रत्नत्रय एज्युकेशन सोसायटीचे संस्थापक अध्यक्ष मा. श्री अनंतलाल (दादा ) दोशी हे कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून उपस्थित होते.
शैक्षणिक वर्ष 2019 -20 या वार्षिक स्नेहसंमेलनातील प्रथम तीन क्रमांक आलेल्या गीतातील विद्यार्थी व मार्गदर्शक शिक्षकांचा सत्कार उपस्थित मान्यवरांच्या शुभहस्ते करण्यात आला. यानंतर इंग्लिश मेडियम ,सेमी व प्री-प्रायमरी च्या विद्यार्थ्यांनी सांस्कृतिक कार्यक्रम सादर केला.या प्रसंगी बोलताना चेअरमन प्रमोद भैय्या दोशी यांनी शाळेच्या प्रगतीचा आलेख मांडला.व पुढे प्रजासत्ताक दिनाबद्दल माहिती सांगितली. त्याचबरोबर त्यांनी सर्व विद्यार्थ्यांना शांतता, समता , बंधुता ही मूल्ये आपल्या जीवनामध्ये जोपासण्याचा संदेश दिला. व राज्यघटनेच्या स्वातंत्र्याचा आदर करण्याचे आव्हान त्यांनी उपस्थित सर्व समुदायास केले.
मा.डॉ.श्री समीर दोशी म्हणाले “विद्यार्थ्यांनी मोबाईलचा अतिवापर टाळावा आणि मैदानी खेळवरती लक्ष केंद्रित करावे.पुढे त्यांनी पालकांना विद्यार्थ्यांच्या आहाराबाबत योग्य ते मार्गदर्शन केले.तसेंच रत्नत्रय इंग्लिश मीडियम स्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाच्या यशस्वी वाटचालीबद्दल समाधान व्यक्त करून भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या . कार्यक्रमाचे अध्यक्ष मा. श्री अनंतलाल (दादा) दोशी म्हणाले “आपण ज्याप्रमाणे धार्मिक सणवार उत्सव हे मोठ्या आनंदाने कौतुकाने उत्साहाने साजरे करतो त्या प्रमाणेच संपूर्ण भारतवासी हा राष्ट्रीय सण सुद्धा साजरा करतात. त्यांनी पुढे देशहिताचे विचार आंगी बाळगण्याची व देशभक्ती, राष्ट्रहित हे प्रत्येक भारतीयांनी आपल्या हृदयी जोपासण्यासाठी वचनबद्ध होण्याचे आव्हान केले. इयत्ता दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांना गुणवत्ता यादीत क्रमांक आल्यास विद्यार्थी व मार्गदर्शक शिक्षक यांना बक्षीस देण्यात येणार असल्याचे जाहीर केले.
सदर प्रसंगी सौ. मृणालिनी दोशी, डॉ. वैशाली दोशी, सन्मती सेवा दलाचे माजी अध्यक्ष श्री महावीर शहा नातेपुतेचे प्रतिष्ठित व्यापारी अतुल मेघचंद्र दोशी, अभयकाका दोशी, विराग गांधी ,सागर दोशी, श्रीशंकर सहकारी साखर कारखान्याचे संचालक रामदास कर्णे, रत्नत्रय इंग्लिश मीडियम स्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाचे अध्यक्ष मा. श्री प्रमोद दोशी , उपाध्यक्ष तुषार गांधी, संस्कृतीक व क्रीडामंत्री डॉ. श्री निवास गांधी, रोनक चंकेश्वर ,वैभव शहा ,संजय दोशी, दत्ता भोसले, रामभाऊ गोफणे, सतीश बनकर , भाग्यश्री दोशी, रेश्मा गांधी, पार्वती जाधव, मुख्याध्यापक, पर्यवेक्षक सर्व विभागाचे विभाग प्रमुख शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी विविध क्षेत्रातील मान्यवर तसेच पालक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक समीर देशपांडे सूत्रसंचालन श्री सतीश हांगे सर व आभार प्रदर्शन दैवत वाघमोडे सर यांनी केले