करुंडे येथे उद्या चैतन्य जप प्रकल्पाचे 22 वे दोन दिवसीय राज्यस्तरीय शिबिराचे आयोजन

पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क प्रमोद शिंदे-
उद्या कारंडे येथे चैतन्य जप प्रकल्पाचे दोन दिवसीय राज्यस्तरीय शिबीर दि. १२ व १३ नोंव्हेंबरला कारूंडे ( लोंढे वस्ती ) ता. माळशिरस,जि,सोलापुर येथे आयोजित करण्यात आले आहे चैतन्य जप प्रकल्पाचै कार्याध्यक्ष शिबीर प्रमुख धैर्यशील भाऊ देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली शिबिराची अंतिम टप्प्यात तयारी झाली असून या शिबीरामध्ये काकड आरती, अंखड सामूदायिक जप नामस्मरण, शोभायाञा, मिरवणूक, प्रसाद,रक्तदान शिबीर, वृक्षारोपण असे धार्मिक व सामाजिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच या शिबिरात राजेंद्र महाराज मोरे, संदिपबूवा मांडके,रांजेंद्र आगवणे, गणपतराव जगताप यांचे प्रवचण किर्तन होणार आहे.
शिबीराचे उद्घाटन सूशिला महादेव पवार यांच्या शुभहस्ते व भारती महाराज, माजी उपमुख्यमंत्री विजयसिह मोहीते पाटील, माळशिरसचे विधानसभा आमदार राम सातपुते, सातारा जि. प.माजी अध्यक्ष संजीवराजे नाईक निंबाळक, फलटण विधानसभा आमदार दिपक चव्हाण,धैर्यशिल देशमुख,धनजय पवार,अमर जगताप, अमोल पाटील,लक्ष्मण आसबे, नंदकूमार जोशी, गणपतराव जगताप,साहेबराव देशमूख,विजय लोंढे, अर्जून जाधव व मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे हे शिबिर जपकारांना एकत्र आणण्यासाठी तसेच शिबिरामुळे तरुणांमध्ये परिवर्तन दिसत आहे तरुण पिढी व्यसनापासून दूर करण्यासाठी विचारांची देवाणघेवाण करण्यासाठी अशा प्रकारच्या शिबिरांच्या आयोजन केले जाते महाराष्ट्रात 365 दिवस वेगवेगळ्या ठिकाणी जपमाळ सुरू आहे नातेपुते फलटण पुणे जिल्हा अशा विविध ठिकाणी आतापर्यंत या शिबिराच्या आयोजन केले आहे यासंदर्भात धैर्यशील भाऊ देशमुख यांनी माहिती सांगितली तसेच या शिबिरासाठी भाविक भक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन धैर्यशील देशमुख यांनी केले आहे.