भारतवर्षीय दिगंबर जैन तीर्थसंरक्षणी उपाध्यक्षपदी अविनाश दोशी यांची निवड
पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क नातेपुते ( प्रतिनिधी )
श्री भारतवर्षीय दिगंबर जैन तीर्थसंरक्षणी महासभेची पश्चिम महाराष्ट्र कार्यकारिणी नुकतीच जाहीर करण्यात आली . यामध्ये नातेपुते येथील अहिंसा सेवा समिती संस्थापक अध्यक्ष तथा नातेपुते नगरपंचायतीचे नगरसेवक अविनाश दोशी यांची पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली . श्री भारतवर्षीय दिगंबर जैन तीर्थसंरक्षणी महासभेच्या माध्यमातून स्वास्थ्य , सेवा , उच्च शिक्षण व स्वयंरोजगारासाठी मदत , जुन्या मंदिरांचा जीर्णोद्धार , सामूहिक विवाह , तीर्थक्षेत्र स्वच्छता मोहीम राबवित समाजकार्य करणाऱ्या महासभेच्या कार्यकारणीच्या निवडी करण्यात आल्या . यावेळी श्री सन्मती सेवा दल बहुउद्देशीय अल्पसंख्याक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष मिहीर गांधी , श्री भारतवर्षीय दिगंबर जैन तीर्थसंरक्षणी महासभा पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष नितीन गांधी फलटण , उपाध्यक्ष अविनाश दोशी नातेपुते मयूर गांधी अकलूज , डॉ . राजेश शहा म्हसवड , विपुल शहा बारामती , राहुल कोले वाळवा हाळभाग , चंद्रकांत वसवाडे , रूई ता . हातकणंगले , नितेश फडे अकलूज , अखिल दोशी मोडनिंब आदी उपस्थित होते . पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्षपदी अविनाश दोशी यांची निवड झाल्याबद्दल त्यांचा सत्कार नातेपुते येथे अहिंसा सेवा समितीच्या वतीने करण्यात आला . यावेळी राजेंद्र डूडू , महेश दावडा , महावीर दोशी , डॉ . तेजस चंकेश्वरा , अतुल दोशी आदीसह अन्य मान्यवर उपस्थित होते. अहिंसा सेवा समितीचे संस्थापक अध्यक्ष नगरसेवक अविनाश जोशी नेहमीच सामाजिक कामात अग्रेसर असतात कोरोना काळात त्यांनी अनेक गरजू लोकांना सलग दोन महिने घरपोच अन्नदान केले आहे तसेच संस्थेच्या माध्यमातून वृक्षारोपण स्वच्छता अभियान मॅरेथॉन स्पर्धा नातेपुते शहरात सीसीटीव्ही साठी योगदान आशा प्रकारे विविध सामाजिक उपक्रम त्यांनी राबवले आहेत