दहिगाव हायस्कूलचे 20 नोव्हेंबरला माजी विद्यार्थी स्नेहसंमेलन, 54 वर्षानंतर भेटणार सवंगडी
दहिगाव हायस्कूलचे 20 नोव्हेंबरला माजी विद्यार्थी स्नेहसंमेलन, 54 वर्षानंतर भेटणार सवंगडी
पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क ( प्रमोद शिंदे)-
प्रगत शिक्षण संस्थेचे
दहिगाव हायस्कूल दहिगाव यांच्यावतीने 20 नोव्हेंबरला सकाळी दहा वाजता 1968 ते 2022 या कालावधी मधील माजी विद्यार्थ्यांचे स्नेहसंमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. संस्थेला पन्नास वर्षे पूर्ण झाल्याच्या आनंदात सुवर्ण महोत्सवानिमित्त तब्बल ५४ वर्षानंतर माजी विद्यार्थी एकमेकांना भेटणार आहेत.याची उत्सुकता सर्व माजी विद्यार्थ्यांना लागली आहे.दहिगाव हायस्कूल दहिगाव ने अनेक गुणवंत विद्यार्थी समाजाला दिले आहे. या हायस्कूल मधून अनेक उच्चपदस्थ अधिकारी मोठे व्यावसायिक विविध क्षेत्रात प्राविण्य मिळवलेले विद्यार्थी घडवलेले आहेत या सर्व विद्यार्थ्यांना 54 वर्षानंतर पुन्हा एकदा एकत्र आणण्याचे काम संस्थेने केले आहे. असे म्हणतात की “ऋणानुबंधाच्या जिथे पडल्या गाठी… भेटीत दृष्टांता मोठी!”विविध ठिकाणी व्यवसायाच्या नोकरीच्या निमित्ताने गेलेल्या माजी विद्यार्थ्यांना एकत्र आणून पुन्हा एकदा जुन्या आठवणींना उजाळा देण्याचे काम संस्थेच्या माध्यमातून होत असल्याने माजी विद्यार्थ्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले आहे. संस्थेच्या वतीने माजी शिक्षक यांचा सन्मान व सर्वांना प्रीती भोजनाचे आयोजन करण्यात आले असून पंचक्रोशीतील सर्व विद्यार्थ्यांना संस्थेच्या अध्यक्ष व सर्व सदस्य मुख्याध्यापक, शिक्षक व कमिटीच्या वतीने निमंत्रित करण्यात आला आहे.