हनुमान विद्यालय शिंदेवाडी येथे संविधान दिन उत्साहात संपन्न
पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क प्रमोद शिंदे-
हनुमान विद्यालय शिंदेवाडी ता माळशिरस येथे संविधान दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.यावेळी प्रमुख अतिथी म्हणून ऍड.सुमित सावंत,पत्रकार प्रमोद शिंदे हे होते. कार्यक्रमाची सुरुवात संविधान रॅली काढून करण्यात आली.डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर,संविधान पुस्तिका व कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.याप्रसंगी ऍड सुमित सावंत बोलताना म्हणाले की जगातील सर्वश्रेष्ठ संविधान हे भारताचे संविधान आहे.संविधानाने सर्व भारतीयांना समान अधिकार दिला आहे. संविधानामुळे देशात कायदा सुव्यवस्था व समानता आहे.तसेच या देशात कर्मवीर अण्णांनी बहुजनांच्या मुलांना शिकण्याची मोठी संधी उपलब्ध करून दिली आहे.पत्रकार प्रमोद शिंदे म्हणाले की स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव आपण मोठ्या उत्साहात साजरा केला आहे.तसेच शासनाने हर घर तिरंगा हा कार्यक्रम राबवला आहे त्याचप्रमाणे शासनाने घर घर संविधान हर घर संविधान हा कार्यक्रम राबवावा म्हणजे प्रत्येक व्यक्तीला आपला अधिकार माहित होईल.या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक आखाडे सर हे होते.याप्रसंगी मुख्याध्यापिका देठे मॅडम,डॉ मचाले सर्व शिक्षक स्टाफ,विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शेगर सर यांनी केले तर आभार मुख्याध्यापक आखाडे सर यांनी व्यक्त केले..