संविधान म्हणजे समता-एपीआय प्रवीण संपांगे

पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क (प्रमोद शिंदे)–पिरळे तालुका माळशिरस येथे जि प शाळा व पुरोगामी महाराष्ट्र यांच्या संयुक्त विद्यमाने संविधान दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नातेपुते पोलीस स्टेशनचे एपीआय प्रवीण संपांगे हे होते.प्रमुख अतिथी म्हणून ऍड सुमित सावंत उद्योजक संदीप नरोळे हे होते. एपीआय प्रवीण संपांगे बोलताना म्हणाले की भारतीय संविधान म्हणजे समता या देशामध्ये संविधानामुळे आपण सर्व समान आहोत.कोणीही उच्च नीच नाही. बाबासाहेबांनी संविधानाच्या माध्यमातून सर्वांना समान अधिकार दिले आहेत.आपल्या देशामध्ये विविध जाती धर्माचे लोक राहतात तरीसुद्धा लोकशाही आहे ती संविधानामुळेच.ऍड सुमित सावंत म्हणाले की संविधान हे सर्व भारतीयांना लागू आहे संविधानाची सुरुवात बाबासाहेबांनी आम्ही भारताचे लोक असे केली आहे. प्रत्येक व्यक्तीला स्वातंत्र्याचा अधिकार संविधानाने दिला आहे.आपल्याला संविधान समजून घ्यायच असेल तर जनजागृती करणे गरजेचे आहे.पत्रकार प्रमोद शिंदे म्हणाले की शासनाने स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त हर घर तिरंगा हा कार्यक्रम राबवला होता.त्याचप्रमाणे संविधानाची जनजागृती होण्यासाठी प्रत्येकाला आपला अधिकार व हक्क माहीत होण्यासाठी शासनाने हर घर संविधान घर घर संविधान हा कार्यक्रम राबवला पाहिजे.उद्योजक संदीप नरोळे यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमादरम्यान शिष्यवृत्ती परीक्षेत यश मिळवलेल्या विद्यार्थ्यांचे व त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षिका शेंडगे मॅडम व नामदे मॅडम यांचा विशेष सत्कार करण्यात आला.याप्रसंगी अध्यक्ष आनंद लवटे, माजी शिक्षणाधिकारी प्रल्हाद साळवे,संदीप वाघ मुख्याध्यापक शंकर शिंगाडे सर व सर्व शिक्षक स्टाफ विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.









