नानासाहेब देशमुख यांच्या समाजकारणाची छाप माझ्यावर पडली -डॉ एम के इनामदार
पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क प्रमोद शिंदे— समाजभूषण नानासाहेब देशमूख याच्या राजकारणात समाजकारणाची छाप होती,त्याच्याच व्यक्तिमत्वाची छाप माझ्यावर पडल्यामूळे मला समाजकारणाची,समाजात चांगले काम करणार्याला मदत करण्याची सवयी लागली असे मत,प्रसिद्ध हृदयरोग तज्ञ डाॅ.एम.के.ईनामदार यांनी व्यक्त केले. समाजभूषण नानासाहेब देशमूख यांच्या९६ व्या जयंतीनिमित्त व एस.एस.डी.इटरनॅशनल स्कूल इमारतीच्या पहीला मजला भूमीपूजन प्रसंगी ते बोलत होते.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ऍड डी.एन.काळे तर प्रमूख पाहूणे म्हणून बापुराव देशमूख(किल्ले वडगांव) हे होते, डाॅ.एम.के.इनामदार पुढे म्हणाले,कोणतीही संस्था चालवत असताना शिस्त अतिशय महत्वाची असते.शिस्त नसेल तर संस्था टिकू शकत नाहि,परंतू नानासाहेब देशमूख यांना दूरदृष्टी असल्यामूळे त्याच्या नावाने चालवलेली व त्यांनी स्थापन केलेल्या असल्याचे . सर्व संस्था प्रगतीपथावर असल्याचे पाहून समाधान वाटते,आर्थीक शिस्ती बरोबरच वैयक्तीक शिस्तही महत्वाची असल्याचे त्यांनी सांगितले. प्रास्तावीक करताना एस.एन.डी.स्कूलचे चेअरमन मालोजीराजे देशमूख म्हणाले कि,ग्रामीण भागातील मूलांना शहरातील स्पर्धेत टिकण्यासाठी सी,बी .एस.सी.अभ्यासक्रम सूरू केला.माझी शाळा माझा विद्यार्थी हि भावना पालकांत दिसून येत असूनहीच यशाची पावती आहे ,अस वाटत.या संस्थेत शिकलेल्या जगाच्याबाजारपेठेत एकनंबर मिळवल असे शिक्षक येथे काम करत आहेत. यावेळी व्यासपिठावरील सहकारमहर्षि शंकरराव मोहीते पाटील व समाजभूषण नानासाहेब देशमूख यांच्या प्रतिमाचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.याप्रसंगी स्कूलमधील विद्यार्थाना बक्षिस वितरीत करण्यात आली,यावेळी,स्वेतश्री पिसाळ,मैथिली बडवे.सनद मोटे,श्रीमय भागवय या मूलांनी समाजभूषण नानासाहेब देशमूख यांच्याविषयी विचार व्यक्त केले. या कार्यक्रमास डाॅ एम .के.इनामदार,डाॅ एम पी मोरे,अॅड डी.एन.काळे.जि.प.माजी उपाध्यक्ष बाबाराजे देशमूख,मार्केटकमिटी उपाध्यक्ष मामासाहेब पांढरे, माऊली पांटील,चेअरमन मालोजीराजे देशमूख,अमरशील देशमूख,नाथाजीराव देशमूख,नारायण देशमूख,सौ विनोदिनी देशमूख,कूमूदिनी पवार,भाग्यश्री निंबाळकर.श्रूतिका देशमूख,नगराध्यक्षा उत्कषाराणी पलंगे,अॅड बी,वाय,राऊत,विरेंद्र दावडा,बाहूबली चंकेश्वरा,अॅड शिवाजीराव पिसाळ,महेश शेटे,अतूल बावकर,विलास काळे,अर्जून जठार,मूख्याधिकारी माधव खांडेकर,सपोनी प्रविण संपांगे,ञ्रूतूजा मोरे!शरद मोरे,रोहीतशेटे, विश्वजित पिसाळ उपस्थित होते.सूञसंचालन शकूर पटेल यांनी केले तर आभार प्राचार्य सदिप पानसरे यांनी मानले
चौकट—कार्यकर्ता हाच राजकारणा आत्मा असतो,कार्यकर्ताल्या कधीही फसवू नका.जात ,धर्म ,पंथ,पक्ष याचा विचार न करता तळागाळातील गरीब माणसाला मदत करणे,चांगले नाही करता आले तर वाईट करू नकाअसे विचार,समाजभूषण नानासाहेब देशमूख यांचै होते,त्याच्या नावाने एखादी संस्था असावी विचार पुढे येऊन रेणूका परीवाराने एस.एन.डी, स्कूलची स्थापना केली.२०२४ अखेर तीन मजले पूर्ण करून सूसज्ज,ग्रथालय,संगणक लॅब,प्रयोगशाळा असेल,तसेच ११वी १२वीसाठी अॅकॅडमी सूरू करून नातेपूते येथे सर्व शैक्षणिक सूविधा मिळतील असे काम करणार आहोत. बाबाराजे देशमूख,माजी जिप उपाध्यक्ष








