ना.चंद्रकांत पाटील यांचे विरोधात नातेपुते शहर कडकडीत बंद.
पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क(प्रतिनिधी): मागील चार दिवसांपूर्वी पैठण येथे झालेल्या सार्वजनिक सभेत उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी कर्मवीर भाऊराव पाटील,महात्मा ज्योतिबा फुले,घटनेचे शिल्पकार डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या शैक्षणिक कार्याबद्दल अवमानकारक भाषा वापरली.चंद्रकांत पाटील यांच्या विरोधात संपूर्ण महाराष्ट्र ढवळून निघाला असताना नातेपुते शहरात देखील सर्व बहुजन समाजातील बांधव एकत्र येऊन बंद ची हाक दिली होती.या बंद साठी नातेपुते शहरातील नागरिक तसेच सर्व व्यापारी वर्ग यांनी शंभर टक्के गाव बंद मध्ये सहभाग नोंदविला.
सकाळी नऊ वाजता युवक वर्गाने नातेपुते शहरात फेरी काढून सर्व महामानव यांच्या सन्मानार्थ घोषणा दिल्या तसेच चंद्रकांत पाटील यांच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली.
दुपारी एक वाजता डॉ बाबासाहेब आंबेडकर चौकात निषेध सभा घेऊन निवेदन देण्यात आले .यावेळी बोलताना रिपाईचे जेष्ठ नेते एन के साळवे यांनी सांगितले की या महामानवानी शिक्षणाची दारे बहुजन वर्गासाठी खुली केली नसती तर चंद्रकांत पाटील आज मंत्रीपदावर नसते.
रासप नेते बशीर काझी यांनी सांगितले की महाराष्ट्रातील बहुजन युवक यांना भरकटविण्याची मोहीम सध्या चालू आहे.
महामानवांवर जे जे बोलतील त्यांनी आपली सुरक्षा बाजूला ठेऊन रस्त्यावर यावे मग आम्ही काय करू शकतो ते दाखवून देऊ रोहित सोरटे.
प्रत्येक महामानवाने देशाला समतेची शिकवण दिली आहे तरी काही लोक अजून त्यांचा दुस्वास कसा करू शकतात विशाल सोरटे.
समतेचा विचार देणाऱ्या महामानवांवर चिखलफेक करण्याचा प्रयत्न भविष्यात कोणी केला तर आज फक्त बंद पाळला आहे जर हे प्रकार थांबले नाहीत तर याच्या पेक्षाही तीव्र आंदोलन होतील. समीर सोरटे .
संघर्ष सोरटे यांनी प्रास्ताविक करून बंद मागील भूमिका स्पष्ट केली. यावेळी रणजित कसबे,लखन सोरटे,सूचित साळवे,विशाल साळवे यांनी देखील आपले मत व्यक्त केले.
शेवटी शासनाला देण्यात येणाऱ्या निवेदनाचे वाचन रिपाईचे जेष्ठ नेते युवराज वाघमारे यांनी केले.हे निवेदन शासनाच्या वतीने मंडल अधिकारी श्री.चव्हाण,गाव कामगार तलाटी प्रभाकर उन्हाळे,नातेपुते पोलिस स्टेशन चे सहा पोलिस निरीक्षक प्रवीण संपांगे यांनी स्वीकारले.
दलीत महासंघ यांचे वतीने देखील पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष केरबा लांडगे व त्यांच्या सहकाऱ्यांनी निवेदन दिले.
नातेपुते शहरातील बंद यशस्वी करण्यासाठी एन के साळवे,युवराज वाघमारे,सुनील साळवे सर, बीपीन सातपुते, नवाज सोरटे,विनोद रणदिवे,रोहित सोरटे,किरण सोरटे,दादा साळवे,दत्ता सोरटे,अभिजित वाळके,वैभव सोरटे,नगरसेवक सुरेंद्र सोरटे,संघर्ष सोरटे,सूचित साळवे,रणजित कसबे,विशाल साळवे,बाळासाहेब सोरटे ,राहुल सोरटे,विशाल सोरटे,दादा अटक, चंद्रकांत राऊत व सर्व युवक वर्गाने विशेष परिश्रम घेतले.