आपली योग्यता आहे तेवढेच आपल्याला देव देत असतो – साध्वी अनुराधा दीदी
आपली योग्यता आहे तेवढेच आपल्याला देव देत असतो – साध्वी अनुराधा दीदी










पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क(नातेपुते ) –आपली योग्यता आहे.तेवढेच आपल्याला देव देत असतो अशा प्रकारचे मत नातेपुते येथे प्रवचन करताना साध्वी अनुराधा दीदी यांनी उपस्थित ताना मार्गदर्शन करताना व्यक्त केले.नातेपुते येथे ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज पुण्यतिथी समारंभ कार्यक्रम सालाबादप्रमाणे घेण्यात आला आहे.या कार्यक्रमात भागवत कथा यज्ञ 10 डिसेंबर ते 16 डिसेंबर दररोज सायंकाळी सहा ते आठ साध्वी परमपूज्य अनुराधा दीदी प्रवचना द्वारे भागवत कथा सांगत आहेत. कथा सांगताना भक्त सुखिया व भगवान श्रीकृष्ण यांचा दाखला देत त्या म्हणाले की त्रिलोक्याचे राज्य दिले तरी सच्चा भक्त भक्ती सोडत नाही.ज्या भक्तावर देवाचा विश्वास असतो त्या भक्ताला देव भरभरून देतो भक्ताने सत्कर्माने राहिले पाहिजे.भक्ताकडे दारिद्र्य असले तरी परमार्थिक ऐश्वर्या असले पाहिजे अशाप्रकारे अनेक दाखले त्यांनी परवचनाद्वारे उपस्थित यांना दिले.तसेच धैर्यशील भाऊ देशमुख यांनी उपस्थित त्यांना मार्गदर्शन केले तसेच नगराध्यक्ष उत्कर्षा राणी पलंगे,उपनगराध्यक्ष मालोजीराजे देशमुखतसेच इतर नगरसेवक व मान्यवरांच्या हस्ते सहकुटुंबआरती करण्यात आली.ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज पुण्यतिथी निमित धैर्यशील भाऊ देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली विविध कार्यक्रमाच्या आयोजन करण्यातले आहे.दिनांक 17 डिसेंबर रोजी ह भ प विलास बुवा गरवारे सिद्धेश्वर कुरोली यांचे नारदीय कीर्तन तसेच दिनांक 18 डिसेंबर रोजी सायंकाळी सहा वाजता सर्व धर्मीय सामुदायिक विवाह सोहळ्याच्या आयोजन करण्यात आले आहे.या कार्यक्रमास बहुसंख्येने उपस्थित राहण्याच्या आव्हान संयोजकाकडून करण्यात आले आहे.