वालवड येथे संत रोहिदास महाराज जयंती उत्साहात साजरी
वालवड येथे संत रोहिदास महाराज जयंती उत्साहात साजरी
“”””””””””””””””””””””””””””””””””””””””””
पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क (जवळा नि )प्रतिनिधी:दि.9
भुम तालुक्यातील मौजे वालवड येथे संत शिरोमणी गुरु रविदास महाराज यांची 644 वी सार्वजनिक जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
अधिक माहिती अशी कि मौजे वालवड येथील वाल्मिकेश्वर मंदीरात महान संत गुरु रविदास महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली. प्रारंभी संत रोहिदास महाराज यांचे प्रतिमेचे पुजन राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे भुम तालुका अध्यक्ष सुनिल ढवारे यांचे हस्ते करण्यात आले.जयंती निमित्त ह.भ.प.सुदाम महाराज घाटनेकर यांचे किर्तनही ठेवण्यात आले होते,प्रमुख पाव्हणे एन.डी.एम.जे.जिल्हाध्यक्ष आजिनाथ राऊत,जिल्हा उपाध्यक्ष रामचंद्र कांबळे,जवळ्याचे सरपंच नवजीवन चौधरी,आण्णासाहेब सातपुते,रमेश आगवने,हरीदास आगवने हे होते यावेळी अर्थ व बांधकाम सभापती दत्ता बापु मोहिते,जि.सदस्य प्रविण खटाळ,सरपंच सिता पाटुळे,औदुंबर मोहिते,श्रीहरी बारस्कर,दत्ताञय कुंभार,जालिंदर तात्या मोहिते,हे उपस्थित होते तसेच जयंती उत्सवात सहभागी प्रमुख पावणे यांचेसह उपस्थित सर्वांना महाप्रसादाचे नियोजनही करण्यात आले होते कार्यक्रमाच्या नियोजनासाठी वालवड येथील चर्मकार समाजातील सर्व कार्यकर्यांसह,सर्वजातीधर्मातील कार्यकर्यांचाही समावेश होता,कार्यक्रमास गावातील सर्व मंडळाचे तरुण कार्यकर्ते, महिला,पुरुषासह व ग्रामस्त उपस्थित होते