महिलांनी ठरवलं तर त्या निश्चितपणे प्रत्येक क्षेत्रात भरारी घेऊ शकतात- जयसिंह( बाळ दादा) मोहिते पाटील

महिलांनी ठरवलं तर त्या निश्चितपणे प्रत्येक क्षेत्रात भरारी घेऊ शकतात- जयसिंह मोहिते पाटील

पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क प्रमोद शिंदे (प्रतिनिधी)शिवपुरी तालुका माळशिरस येथे जयसिंह मोहिते पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त सतीश तात्या ढेकळे यांच्या वतीने महिला मेळाव्या चे आयोजन करण्यातले होते.या मेळाव्यात जयसिंह मोहिते पाटील हे कार्यक्रमाचे उद्घाटक होते. तरध्यक्षस्थानी बाबाराजे देशमुख हे होते.कार्यक्रमात बोलताना जयसिंह मोहिते पाटील म्हणाले की महिलांनी ठरवलं तर त्या निश्चितपणे प्रत्येक क्षेत्रात भरारी घेऊ शकतात.त्यांनी स्वतःच्या पायावर उभा राहण्याचा प्रयत्न केला पाहिजे.बचत गट मेळावाच्या माध्यमातून सतीश ढेकळे यांनी महिलांना चांगली संधी उपलब्ध करून दिली आहे.आशा कार्यक्रमाचा महिलांनी फायदा घेतला पाहिजे. भविष्यात गावच्या प्रगतीसाठी विविध योजनांच्या माध्यमातून महिलांना विशेष सहकार्य केले जाईल.तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष बाबाराजे देशमुख म्हणाले की आर्थिक दृष्ट्या बचत गटाच्या माध्यमातून महिला सबलीकरण झालं पाहिजे पतसंस्थेच्या माध्यमातून महिला बचत गटांना आर्थिक मदत करण्याचा प्रयत्न करू. तसेच 08 मार्च रोजी नातेपुते येथे भव्य महिला मेळाव्याचे आयोजन करण्यात येणार आहे असे ते बोलत होते.या कार्यक्रमात महिलांसाठी रांगोळी स्पर्धा,संगीत खुर्ची, उखाणे्धा घेण्यात आली व ढेकळे यांच्या वतीनेमोठ्या प्रमाणात बक्षीस देण्यात आले या कार्यक्रमास महिलांनी मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दिला.यावेळी एकशिव गावचे उद्योजक सतीश तात्या ढेकळे.मा.सरपंच शहाजी दादा धायगुडे  सरपंच सीमा संदीप नरोळे, शिल्पा रंजीत पाटील, सुरेखा विनोद हुंबे, प्रिया नितीन रुपनवर, तसेच उद्योजक संदीप नरोळे, संदीप वाघ,प्रताप पाटील,शंकर जानकर श्रीकेश वरुडे, शांतिनिकेतन साळवे,अय्याज मुलानी मोठ्या संख्येने महिला व ग्रामस्थ उपस्थित होतेकार्यक्रमाचे प्रास्ताविक अर्चना रुपनवर तर सूत्रसंचालन विठ्ठल सूर्यवंशी यांनी केले.

You may have missed