अतिक्रमण नियमानुकुल करण्यासाठी एन डी एम जे च्या वतीने तहसील कार्यालयावर आंदोलन

अतिक्रमण नियमानुकुल करण्यासाठी एन डी एम जे च्या वतीने तहसील कार्यालयावर आंदोलन
पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क (प्रतिनिधी) शासकीय जागेमध्ये आतिक्रमण नियमानुकुल करण्या संदर्भात नॅशनल दलित मूव्हमेंट फॉर जस्टीस संघटनेच्या वतीने विकास दादा धाईंजे व वैभव गीतेंच्या नेतृत्वात माळशिरस तहसील कार्यालयावर आंदोलन करण्यात आले.
अतिरिक्त मुख्य सचिव ग्रामविकास व पंचायतराज महाराष्ट्र शासन यांच्या 20 ऑक्टोबरच्या 2018 पत्रानुसार मंत्रिमंडळ बैठकीमध्ये दिलेल्या निर्देशानुसार ग्रामीण भागातील शासकीय जमिनीवरील निवासी प्रयोजनार्थ केलेली अतिक्रमणे नियमाकूल करण्यास गती देऊन सदर निवासस्थानाची जागा अतिक्रमण धारकाच्या नावे करण्यात यावी, तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी जि.प सोलापूर यांनी दिनांक 19/12/2022 रोजी दिलेल्या पत्रानुसार सर्व जाती धर्मांच्या नागरिकांची अतिक्रमण नोंदणी मध्ये कार्यवाही करणे तसेच माळशिरस तालुक्यात शेती महामंडळाच्या जागेत अतिक्रमण करून राहिलेल्या लोकांचे अतिक्रमण निवासी नियमानुकुल करून गावच्या हद्दीतील शेती महामंडळाच्या जागेवर राहणाऱ्या नागरिकांच्या घराची नोंद करून त्यांना नमुना नंबरआठ चा उतारा देण्यात यावा.माळशिरस तालुक्यातील सर्व नगरपंचायत शहरांतर्गत व ग्रामीण भागातील अतिक्रमण नियमानूकूल करण्यासाठी केलेल्या कार्यवाहीचा अहवाल बैठकीत सादर करावा.तसेच अतिक्रमणा संदर्भात मा.तहसीलदार यांच्या अंतर्गत मा.गटविकास अधिकारी तसेच संबंधित अधिकारी व पदाधिकारी यांची तात्काळ बैठक लावण्यात यावी अशी मागणी आंदोलना दरम्यान करण्यात आली . तसेच या संदर्भात नऊ मागण्या घेऊन आंदोलन करण्यात आले. या आंदोलनास नायब तहसीलदार तुषार देशमुख यांनी भेट दिली व सदर सर्व मागण्यांवर पुढील कारवाई करण्यात येईल असे आश्वासन दिले.याआंदोलनास आंबेडकरी चळवळीचे नेते विकास धाईंजे एन डी एम जे राज्यसचिव वैभव गीते,प्रमोद शिंदे
सुनील भोसले, गणेश गायकवाड, गोरख गायकवाड,सुरज गायकवाड,आशिष धांडोरे ,प्रज्ञेश कांबळे,व बहुसंख्य कार्यकर्ते उपस्थित होते. सदर आंदोलनास पंचायत समिती सदस्य अजय सकट प्रहार संघटनेच्या वतीने पाठिंबा देण्यात आला.

You may have missed