जि प शाळेतील शिक्षक दादासाहेब साळवे यांनी शिष्यवृत्ती विद्यार्थ्यांना दिले 75 हजारचे पुस्तकांचे संच
गरीब घरातील विद्यार्थी हा घडला पाहिजे. डॉ बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते आपल्या कमाईतील विसावा हिस्सा हा सामाजिक कार्यासाठी दिला पाहिजे त्यातूनच समाज उन्नती होईल म्हणून दरवर्षी हा उपक्रम आम्ही हाती घेतो- दादासाहेब साळवे
पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क (प्रमोद शिंदे)–
जि प शाळा कळंबोली येथील शिक्षक दादासाहेब साळवे यांनी सामाजिक भान ठेवून2023 मध्ये माळशिरस तालुक्यात शिष्यवृत्ती परीक्षेत बसणाऱ्या विद्यार्थ्यांना सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त सलग तिसऱ्यांदा 75 हजार रुपयाचे पुस्तक संच भेट दिले.नातेपुते येथे गट शिक्षणाधिकारी धनंजय देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली जि प शाळेतील विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती शिकवणाऱ्या शिक्षकांसाठी प्रशिक्षण शिबिराचे आयोजन केले होते.याच कार्यक्रमात माळशिरस तालुक्यातील विद्यार्थ्यांना दादासाहेब साळवे सर यांच्या वतीने पुस्तक संच देण्यात आले.कार्यक्रमादरम्यान प्रास्ताविकेत गटशिक्षणाधिकारी धनंजय देशमुख सर म्हणाले की जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये फक्त गोरगरिबांची मुलंशिकायला येतात त्यांना चांगल्या दर्जाचे शिक्षण मिळाले पाहिजे यासाठी सर्व शिक्षक प्रयत्न करत आहेत .तसेच या शिष्यवृत्तीचा टक्का वाढवा म्हणून या शिबिराचे आयोजनन केले आहे.तसेच यावेळेस 83 विद्यार्थी शिष्यवृत्तीला पास झाले आहेत.तर पुढील काळात जिल्हा परिषद ची 100 पेक्षा जास्त मुले शिष्यवृत्तीला यश मिळवतील या दृष्टिकोनातून प्रयत्न सुरू आहेत.पत्रकार सुनील राऊत बोलताना म्हणाले की मला मराठी शाळा व शिक्षकांचा अभिमान आहे.मराठी शाळेतील शिक्षक व शिक्षिका हे मुलांचे आई बाप असतात विद्यार्थ्यांना चांगलं घडवण्याचं काम करतात.या कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून गटशिक्षणाधिकारी देशमुख साहेब,पत्रकार सुनील राऊत, करडे साहेब,मुख्याध्यापक बडवे सर,सुधीर नाचणे सर,पत्रकार आनंद लोंढे, प्रमोद शिंदे आदी मान्यवर होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रशांत सरोडकर सर यांनी केले.या कार्यक्रमास चंद्रशेखर शिवगुंडे,प्रदीप कनाळ,बापूसाहेब कांबळे,झोडगे सर, राजाभाऊ गुजर सर,वनसाळे सर,माने सर,जब्बर मुलाणी सर, सर्व केंद्रप्रमुख व मोठ्या संख्येने शिक्षक वर्ग उपस्थित होते.