कळंबोली पुलावरून स्विफ्ट गाडी चार जणांसह भरलेल्या नदीत कडून अपघात
पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क प्रमोद शिंदे-
कळंबोली ता माळशिरस येथील पुलावरून पहाटे च्या सुमारास टेंभुर्णी येथील एम एच 45 ए क्यू 92 93 ही स्विफ्ट गाडी चार जणांसह भरलेल्या नदीत पडून भीषणअपघात झाला आहे.हकीकत आशिकी पहाटे चारच्या सुमारास सागर घोडके राहणार टेंभुर्णी हे टेंभुर्णी वरून कळंबोली ला पाहुण्याकडे येत असताना पहाटेच्या सुमारास एका ट्रकने गाडीला नदीच्या पुलावर रकट मारल्यामुळे तीस्विफ्टगाडी नदी वरील अरुंद पूल व कठडा नसल्यामुळे नदीमध्ये कोसळली त्या स्वीट मध्ये चौघे प्रवास करत होते. सुदैवाने कोणतीही जीवित हानी झालेली नाही.स्थानिकांच्या मदतीने चौघांचा जीव वाचवण्यात आला. दुसऱ्या दिवशी क्रेन च्या साह्याने गाडी बाहेर काढण्यात आली. नेहमीच या पुलावरअशा प्रकारचे अपघात होत असतात.काहींना या पुलावरून खाली पडून आपला जीव गमवावा लागला.या पुलावरून नेहमीची वर्दळ असते शाळेला व कॉलेजला जाणारे विद्यार्थ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. शाळेला जाताना विद्यार्थ्यांना जीव मुठीत घेऊन पूल ओलांडवा लागतो .दरवेळेस नदीवर निकृष्ट दर्जाचे संरक्षक कठडे बांधले जाते व पूर आल्यानंतर ते पुराच्या प्रवाहात वाहून जातात.लवकरात लवकर पुलावरील कठडे संरक्षण भिंत चांगल्या दर्जाचे बांधण्यात यावे व पुलाची रुंदी वाढवण्यात यावी अशी मागणी एन डी एम जे चे प्रमोद शिंदे व स्थानिक ग्रामस्थांकडून होत आहे. लवकरात लवकर पुलाच्या कठड्याचे काम सुरू केले नाहीतर 26 जानेवारीला ग्रामस्थांसह पुलावरा तीव्र स्वरूपाचे आंदोलन करणार असल्याचा इशारा राज्य प्रसिद्धी प्रमुख प्रमोद शिंदे यांनी केला आहे.जर इथून पुढे एखाद्याचा अपघात होऊनअनर्थ झाला तर याला जबाबदार संबंधित विभाग असेल.व संबंधित विभागातील अधिकाऱ्यावर सदोष मनुष्यवदाचा गुन्हा दाखल करणार.