उंबरे दहिगाव ग्रामपंचायतीवर राष्ट्रवादी काँग्रेसचा झेंडा
पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
मौजे उंबरे दहिगाव तालुका माळशिरस येथील जनतेतून सरपंच पदी सौ. शोभा विजय ठोंबरे यांची निवड झाल्यानंतर आज मा. विष्णुपंत नारनवर यांच्या मार्गदर्शनाखाली उपसरपंच पदी राष्ट्रवादीचे नेते दत्तात्रेय ढेकळे यांचे बंधू श्री बापूराव गोविंद ढेकळे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून दतात्रय गायकवाड व ग्रामसेवक एम. के. शिंदे यांनी कामकाज पाहिले. यावेळी ग्रामपंचायतचे नवनिर्वाचित सर्व सदस्य व पांडुरंग ढेकळे, लक्ष्मण ठोंबरे, दत्तात्रय जगन्नाथ ढेकळे विठ्ठल बाबु ढेकळे,सोपान महादेव वाघमोडे, मारुती वाघमोडे, मधुकर ठोंबरे,विष्णू ठोंबरे, रामचंद्र ठोंबरे तुकाराम दशरथ वाघमोडे समस्त ग्रामस्थ उपस्थित होते.या निवड प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर नवनिर्वाचित सरपंच व उपसरपंच यांचा समस्त उंबरे दहिगाव ग्रामस्थांच्या वतीने सत्कार करण्यात आला. यावेळी नवनिर्वाचित सरपंच सौ शोभा विजय ठोंबरे यांनी आपल्या कामातून गावाच्या विकासासाठी कटिबद्ध राहील असे प्रतिपादन केले. यावेळी उपसरपंच श्री बापुराव ढेकळे यांनी श्री दत्तात्रय पंत ढेकळे यांच्या मार्गदर्शनाखाली उंबरे गावचा विविध विकास कामातून चेहरा मोहरा बदलू व गावच्या विकास साठी नेहमी कटीबद्ध राहु असे प्रतिपादन केले.
