नगरपंचायत धरतीवर स्वीकृती धारक ग्रामपंचायत सदस्य ग्रामपंचायत मध्ये नेमण्यात यावा-सरपंच वीरकुमार दोशी यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र
नगरपंचायत धरतीवर स्वीकृती धारक ग्रामपंचायत सदस्य ग्रामपंचायत मध्ये नेमण्यात यावा- सरपंच वीरकुमार दोशी
पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
नातेपुते-(प्रतिनिधी) नगरपंचायत धरतीवर स्वीकृती धारक ग्रामपंचायत सदस्य ग्रामपंचायत मध्ये नेमण्यात यावा ही मागणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना सदाशिव नगरचे नवनिर्वाचित सरपंच- वीरकुमार दोशी यांनी पत्राद्वारे केले आहे पत्रात असे म्हटले आहे की
राज्यघटनेच्या नियमानुसार नगरपरिषद नगरपंचायत महाराष्ट्र ची विधानसभा देशाची लोकसभा यामध्ये राष्ट्रपती राज्यपाल यांच्या माध्यमातून खासदार आमदार निवडले जातात तर नगरपंचायतीमध्ये देखील स्वीकृती धारक नगरसेवक निवडले जातात .त्याच धर्तीवर ग्रामपंचायत , सामाजीक , विविध विकासात्मक विषयांत विषेष तज्ञ असणारे लोक अनेकवेळा राजकीय प्रवाहाबाहेर राहतात . निवडणुकांमध्ये सहभागी होत नाहीत . अशा तज्ञ लोकांची निकड ग्रामपंचायत सभागृहाला कायम भासते . अशा लोकांना स्वीकृत सदस्य पदाची संधी निळाल्यास या लोकांचा अनुभव हा ग्रामपंचायत अथवा जनहितासाठी सार्थ ठरू शकतो. त्यामुळे जर नगरपंचायत धरतीवर ज्याप्रमाणे स्वीकृत नगरसेवक . त्याचप्रमाणे स्वीकृत ग्रामपंचायत सदस्य नेमण्याचा अधिकार नवनियुक्त ग्रामपंचायत सदस्य व जनतेतून निवडून आलेल्या सरपंचाला तर चांगल्या लोकांना देखील ग्रामपंचायत मध्ये नेतृत्व करण्याची संधी . व अशा लोकांच्या अनुभवाचा फायदा ग्रामपंचायत व जनतेला निश्चित होईल. आशा करतो की ‘ अशा प्रकारचा कायदा विधिमंडळात पारित झाल्यास याचा फायदा ग्रामपंचायत थरावर होईल यात शंका नाही . यासाठी पहिला ग्रामपंचायत ठराव आमच्या ग्रामपंचायतच्या माध्यमातून आपणास पाठवीत आहोत.सदर पत्राची संपूर्ण परिसरात चर्चा होत आहे