खडतर परिश्रमाच्या जोरावर सतीश तात्या ढेकळे यांची गरुड झेप सामाजिक कार्यात सिंहाचा वाटा
पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क प्रमोद शिंदे-
एकशिव ता.माळशिरस जिल्हा सोलापूर येथील 40-41 वर्षाचा युवक सतीश तात्या ढेकळे जिद्द,मेहनत आणि चिकाटी च्या जोरावर त्यांनी उद्योग सामाजिक क्षेत्रात गरुड झेप घेतले आहे.
खरंतर सतीश ढेकळे गरीब कुटुंबात जन्माला आलेला व्यक्तिमत्व प्राथमिक शिक्षण एकशिव येथे तर माध्यमिक शिक्षण प्रतापसिंह मोहिते पाटील विद्यालय शिवपुरी येथे इयत्ता दहावीपर्यंत.परिस्थिती बेताची असल्याने कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी काम केल्याखेरीज पर्याय नव्हता म्हणून त्यांनी गाव सोडून बाहेर मजुरी करण्याचा निर्णय घेतला
व ते पेंटिंगचं काम करण्यासाठी मजूर म्हणून हैदराबाद येथे एका ठेकेदाराच्या कडे गेले सुरुवातीला काम कसं करायचं माहित नव्हतं पहिल्यांदाच घरातून बाहेर पडल्यामुळे बाहेरचं जग कसं असतं हे माहित नव्हतं पहिले चार-पाच दिवस वडापाव वर आपल्या पोटाचे भूभागवली.राहिला निवारा नव्हता म्हणून तिथेच सिमेंटच्या गोडाऊनमध्ये मुक्काम ठोकला हळूहळू एका चांगल्या व्यक्तीची ओळख झाली व त्या व्यक्तीने प्रामाणिकपणा पाहून काम दिले.
त्यानंतर सतीश तात्या ढेकळे यांनी कधीच माघार वळून पाहिलं नाही त्यांनी एक उत्तुंग गरुड झेप घेतली व आज सामाजिक क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कामगिरी करून दाखवली ते भाजपाचे पिरळे पंचायत समिती गणातून प्रबळ दावेदार मानले जातात.त्यांनी कोणत्याही राजकीय पदावरती नसताना अनेक लोकांना निस्वार्थ भावनेने मदत केली आहे.
एकशिव व पिरळे व इतर ठिकाणी स्वखर्चाने अनेक बोअर वेल दिले.
गेल्या 15 ते 20 वर्षांपासून गोर गरीब गरजू लोकांना पुणे मुंबई सारख्या मोठ्या दवाखान्यामध्ये लागणारी आर्थिक मदत केली,व पेशंट ला घरी सोडण्यासाठी अँबूलन्स ला जादा पैसे देण्याऐवजी स्वतःच्या गाडीने पेशंट ला घरी पोचवणे.
कोरोना काळात अनेक गरजू लोकांना किराणा साहित्य व दवाखान्यात साठी लागणारे सर्व औषधा सहित होणार सम्पूर्ण खर्च केला.
स्वतःच्या साई एंटरप्राइजेस या व्यवसायच्या माध्यमातून अनेक तरुण मुलांना रोजगार उपलब्ध करून दिला.
ज्यांना व्यवसाय करायचा आहे अशा व्यक्तींना आर्थिक सहाय्य व व्यवसाय मार्गदर्शन करून अनेकांना स्वतःच्या पायावर उभा केले.
गावात पावसाळ्यात ज्या ठिकाणी रस्ता मध्ये चिखल होऊन चालता येत नाही अशा, एकशिव पिरळे चव्हाणवाडी बांगार्डे ठिकाणी स्वखर्चाने खडीकरण करून रस्ता करून दिला.
सर्व महापुरुषांच्या जयंती निमित्ताने अनेक सामाजिक उपक्रम राबविले.
गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप केले, व शालेय विद्यार्थ्यांना शालेय प्रवेश घेऊन दिला.
तरुण मुलांना प्रेरणा देण्यासाठी अनेक क्रीडा स्पर्धा त्यामध्ये क्रिकेट स्पर्धा,आट्यापाट्या व हॉलीबॉल आशा अनेक क्रीडा स्पर्धांचे आयोजन केले. लोकांचे आरोग्य चांगले राहावं म्हणून आरोग्य शिबिराचे आयोजन.
पुणे सारख्या शहरातील आमदार व नगराध्यक्ष नगरसेवक यांच्या सहकार्याने अनेकांना गरजवंताना व्यवसाय व नोकरीची संधी उपलब्ध करून दिल्या. त्यांच्या माध्यमातून अनेक समाजकार्य ही मोठ्या प्रमाणात केली जात आहेत सर्व समाज उपयोगी कामे उद्योजक सतीश तात्या ढेकळे यांनी केली आहे त्याचबरोबर त्यांचं कामच सर्व सामान्य लोकांना आवडत असून त्यांना अतिशय उस्फुर्त प्रतिसाद पिरळे पंचायत समिती गणातून मधून मिळत आहे त्यामुळे पिरळे पंचायत समिती गणातून उद्योजक सतीश तात्या ढेकळे हे पंचायत समिती गणाचे प्रबळ दावेदार मानले जात आहेत. आशा दमदार व दिलदार मित्राला जन्मदिनाच्या खूप खूप शुभेच्छा
प्रमोद शिंदे पिरळे नातेपुत
9975903040