महात्मा फुले जयंतीनिमित्त पुरोगामी महाराष्ट्र च्या वतीने रक्तदान शिबिर संपन्न


पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क – पिरळे येथे सालाबाद प्रमाणे महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीचे औचित्य साधून पुरोगामी महाराष्ट्र न्यूज परिवाराच्यावतीने रक्तदान शिबिर घेण्यात आले.गेल्या दहा वर्षापासून छत्रपती शिवाजी महाराज महात्मा ज्योतिबा फुले,डॉ.आंबेडकर जयंती निमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात येते. याही वर्षी भगवान महावीर, महात्मा बसवेश्वर,महात्मा फुले,डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या  जयंतीनिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.याशिवारात 59रक्तदात्यांनी रक्तदान केले. या  शिबिराचे चेउद्घाटन भीमा कोरेगाव संरक्षण संघर्ष समिती अध्यक्ष तथा ज्येष्ठ पत्रकार स्तंभ लेखक दादाभाऊ अभंग त्यांच्यास्ते करण्यात आले.प्रमुख पाहुणे म्हणून प्राध्यापक सुनील साळवे व एन डी एमजे राज्यसचिव वैभव गीते,ज्ञानदीप संस्थेचे प्राचार्यसी.डी ढोबळे तसेच  पिरळे गावचे मा सरपंच संदीप सेठ नरोळे,प्राध्यापक दीपक शिंदे,सरपंच रेश्मा सुनील दडस,ग्रामसेवक हनुमंत वगरे होते.मान्यवरांच्या हस्ते सर्व महापुरुषांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले तसेच दादाभाऊ अभंग,वैभव गीते ,प्राध्यापक सुनील साळवे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.,32 पिढीतांचे पुनर्वसन केल्याबद्दल पिरळे ग्रामस्थ व दादाभाऊ अभंग यांच्या वतीने वैभव गिते यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांचा भव्य नागरिक सत्कारकरण्यात आला.याप्रसंगी पंढरपूर येथील एडवोकेट रोहित एकमल्ली,उस्मानाबाद आदिनाथ राऊत, पोलीस पाटील औदुंबर  बुधावली,संदीप वाघसर ,डॉ हनुमंत माने,दत्तात्रेय लवटे,महादेव शिंदे शिवाजी लवटे, तंटामुक्ती अध्यक्ष संजय पाटील, ह भ प खेडेकर महाराज,धनंजय ढगे ,सुदाम बुधावले,जिल्हा परिषद शिक्षक,संजय ढवळे सर,खरात सर,जब्बार मुलानी सर, मेजर जाधव, तसेच पंचक्रोशीतील अनेक मान्यवर कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.रक्तदान यशस्वी होण्यासाठी प्रमोद शिंदे,प्रशांत खरात ,प्रज्ञेश  कांबळे,मोहन शिंदे,चैतन्य बल्लाळ,मयूर साळवे,अक्षय ठवरे, तसेच ज्ञानदीप रक्तपेढीतील सर्व स्टाफ परिश्रम घेतले.

You may have missed