वकील संघटनेच्या वतीने जागर संविधानाचा ऑनलाइन वक्तृत्व स्पर्धा बक्षीस वितरण सोहळा संपन्न
पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
26 जानेवारी भारतीय संविधान अमृत महोत्सव वर्षानिमित्त माळशिरस तालुका वकील संघटनेच्या वतीने ऑनलाइन वक्तृत्व स्पर्धेचा बक्षीस वितरण सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला.दिनांक 6 डिसेंबर 2023 ते 20 जानेवारी 2024 या दरम्यान माळशिरस वकिल बांधवांनी यांच्यावतीने आयोजित केलेला जागर संविधानाचा राज्यस्तरीय ऑनलाईन वक्तृत्व स्पर्धा 2023 या स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ काल दिनांक 26 जानेवारी 2024 रोजी अकलूज येथिल लक्ष्मी बालाजी हॉल येथे मोठ्या उत्साहात पार पडला. सदर वक्तृत्व स्पर्धा ही ऑनलाइन घेण्यात आली, यामध्ये अनेक स्पर्धकांनी भाग घेतला होता, महाराष्ट्रातील अमरावती, धाराशिव, अहमदनगर, सातारा, सोलापूर, पुणे, रायगड , सिंधुदुर्ग , मुंबई भागातील स्पर्धक सहभागी झाले होते.सदर स्पर्धेमध्ये क्रमांक पटकविलेल्या स्पर्धकांना मा. , निवृत जिल्हा न्यायाधीश तथा डायरेक्टर ऑफ प्रोसेक्युशन सोपानराव निकम तसेच सरकारी वकील महेश कोळेकर, आक्काताई बडरे, संपादक पुरोगामी महाराष्ट्र न्यूज चॅनल,प्रमोद शिंदे, शंकर बागडे, हेड, स्मायल एफ एम अकलूज, आणि ॲड. नागनाथ शिंदे, अध्यक्ष, माळशिरस वकिल संघटना यांचे हस्ते देण्यात आले. सदर स्पर्धेची रूपरेषा आणि संकल्पना प्रास्ताविकेच्या माध्यमातून ॲड. सुमित सावंत यांनी मांडली. स्पर्धेत प्रथम क्रमांक सुचित्रा कांबळे, गोरेगाव, मुबई, यांना मिळाला असून 11,111/- रुपये, द्वितीय क्रमांक प्रगती गेंड, भांबुर्डी, माळशिरस यांना 7,777/- रुपये, , तृतीय क्रमांक ॲड. अल्ताफ आतार, अकलूज यांना रक्कम रुपये 5,555/- , सर्वांना प्रमाणपत्र सन्मानचिन्ह देण्यात आले .तसेच दोन उतेजनार्थ पारितोषिक हर्षद पुडेगे, सोलापूर आणि आदित्य विलांकर, डोंबिवली, मुम्बई यांना प्रत्येकी रक्कम रुपये 3000, देण्यात आले आहेत.सर्व सहभागी स्पर्धकांना प्रमाणपत्र देण्यात आले आहे. स्पर्धेचे निरीक्षक म्हणून प्रा.देविदास गेजगे यांनी काम पाहिले.या कार्यक्रमास परसरतील वकिल , विविध क्षेत्रातील समजिक, राजकीय पक्षांतील कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी ॲड. रजनी गाडे, ॲड. सुनिता सातपुते, ॲड. वैशाली कांबळे, ॲड. धनंजय बाबर, ॲड. भारत गोरवे, ॲड. सुमित सावंत, ॲड. वैभव धाईंजे, ॲड. अजिंक्य नवगिरे, ॲड. सुयश सावंत, ॲड.नितीन भोसले, ॲड. धर्याशिल भोसले, ॲड. मनोज धाईंजे यांनी प्रयत्न केले.