हनुमान विद्यालयात दिले विद्यार्थिनींना स्वसंरक्षणाचे धडे युवती सक्षमीकरण कार्यशाळा


*महिला दिन विशेष *
नातेपुते /प्रतिनिधी भारतीय जैन संघटना व रयत शिक्षण संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने शिंदेवाडी तालुका माळशिरस येथील रयत शिक्षण संस्थेच्या हनुमान विद्यालय व ज्युनिअर कॉलेज मध्ये दोन दिवसीय युवती सक्षमीकरण कार्यशाळा घेण्यात आली या कार्यशाळेचे उद्घाटन सरपंच गीता सपकाळ ,ग्रामसेविका निलोफोर आतार, पोलीस पाटील शमिता धाईंजे, यांच्या शुभहस्ते तर समारोप निर्भया पथकातील नाजनीन तांबोळी, मोनाली पवार यांच्या उपस्थितीत झाला.
एकविसाव्या शतकातील आव्हानांना सामोरे कसे जायचे याची क्षमता मुलीमध्ये यावे या उद्देशाने हा कार्यक्रम घेण्यात आला. गेल्या काही वर्षात मुलींवरील अत्याचाराच्या प्रमाणात लक्षणीय वाढ झाली आहे अशा वेळी मुलींना सक्षम करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे .बाहेर प्रदूषित वातावरण असतानाही आपल्या घरातील मुलींना त्यांच्या शिक्षणासाठी करिअरसाठी बाहेर पाठवणे क्रमप्राप्त आहे. हे पाठवणे निर्धास्तपणे व्हावे अशी परिस्थिती निर्माण करता आली पाहिजे .आपली मुलगी हे प्रशिक्षण घेतल्यावर बाहेरील वातावरणात जाऊन अगदी सुरक्षितपणे परत येईल असा विश्वास तिच्या त्या कार्यशाळेनंतर निर्माण होणार आहे .तिला येणाऱ्या संभाव्य समस्येवर सहजतेने मात करू शकते असा अनुभव आला आहे.कॉम्प्युटरमधिल अँटी-व्हायरस चे काम ही कार्यशाळा करते इतर कोणत्याही बाह्य व्हायरसमुळे मुलींचे स्वास्थ्य खराब होणार नाही याची काळजी त्यांना घेता येते .
कार्यक्रमास सरपंच गीता सपकाळ,निलोफर आतार, पोलीस पाटील सुनिता धाईंजे, निर्भया पथकाच्या नाजनिन तांबोळी,मोनाली पवार,सचिन लवटे,सचिन भोसले प्राचार्य सूर्यकांत भालेराव,पर्यवेक्षिका मिताली देठे,ज्योती कांबळे, उषा डोंबाळे ,उर्मिला काशीद,अमृता सपकाळ, सुनिता नलवडे,पल्लवी सोनवले,अनिता गावडे ,कोमल पवार उपस्थित होते तसेच या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दिलशाद मुलांनी मॅडम यांनी केले..
———————————————————————मुलींना कमेंट्स करणे,मुली जाताना मित्राशी मोठ्याने बोलणे,एसटी ,सार्वजनिक चौक,थांबण्याची गरज नाही त्या ठिकाणी थांबणे ही सर्व छेडछाड असुन विद्यार्थ्यांनी वाईट कृत्य केल्यास अल्पवयीन म्हणून त्यांच्यावर गुन्हा दाखल होतो.चरित्रप्रमाण पत्र मिळत नाही ,अडचणी येतात.विद्यार्थ्यांनी पश्चाताप होईल असे वागू नका.अडचण आल्यास ८०८०१६७२१६ या मोबाईल नंबर वर निर्भया पथकास संपर्क करा.
——- नाजनीन तांबोळी
निर्भया पथक
———————————————————————मुलींच्या संरक्षणासाठी व मुलांच्या बहिणीच्या संरक्षणासाठी ही कार्यशाळा आहे अन्याय करणाऱ्या पेक्षा अन्याय सहन करणारा जास्त दोषी असतो मुलींनी निर्भय धाडसी तेजस्वी बनण्यासाठी या कार्यशाळेचा उपयोग होईल. ——-प्राचार्य सूर्यकांत भालेराव
हनुमान विद्यालय व ज्यू.कॅालेज शिंदेवाडी
———————————————————
आव्हानांना सामोरे जाण्यासाठी युवती सक्षमीकरण कार्यशाळा.आत्मजाणीव,संवाद आणि नातेसंबंध ,मासिक पाळी व स्वच्छता, आत्मसन्मान व स्वसंरक्षण,निवड व निर्णय ,मैत्री आणि मोह, प्रलोभने तरुण मुलांचे पालकत्व या सात बाबी या कार्यशाळेत घेण्यात आल्या कार्यशाळेमुळे कोणत्याही बाह्य व्हायरसाचा परिणाम मुलीवर होणार नाही त्यामुळे मुलींचे स्वास्थ्य बिघडणार नाही . ——पल्लवी सोनवले
कार्यशाळा प्रशिक्षिका

You may have missed