*धर्मपुरी ग्रामपंचायत च्या वतीने मागासवर्गीय मुलींना सायकल वाटप व कुस्ती केंद्राचे उद्घाटन

*धर्मपुरी ग्रामपंचायत च्या वतीने मागासवर्गीय मुलींना सायकल वाटप व कुस्ती केंद्राचे उद्घाटन*

*नातेपुते (प्रमोद शिंदे) -धर्मपुरी ता.माळशिरस  येथे ग्राम निधी 15 टक्के मागासवर्गीय निधी मधून मागासवर्गीय विद्यार्थिनींना 25 सायकल वाटप करण्यात आले तर दहा टक्के महिला बालकल्याण निधी मधु अंगणवाडी तील विद्यार्थ्यांना 240 ड्रेस वाटप करण्यात आले. व पाच टक्के अपंग निधी तून 19 लाभार्थ्यांच्या खात्यावर  प्रत्येकी २००० रुपये जामा करण्यात आले. तसेच स्वर्गवाशी मा.आमदार हनुमंतराव डोळस यांच्या फंडातून कुस्ती केंद्र उभारण्यात आले. जय हनुमान कुस्ती केंद्र धर्मपुरी कुस्ती केंद्राचे उद्घाटन नातेपुते पोलीस स्टेशनचे ए.पी.आय.युवराज खाडे यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून ए.पी.आय. युवराज खाडे कुस्ती निवेदक युवराज केचे, 1988 महाराष्ट्र केसरी नाना मगर, शिवछत्रपती पुरस्कार विजेते पै.उमेश सूळ , दादा जवळकर आदी मान्यवर होते. ए.पी.आय.खाडे बोलताना म्हणाले की, कुस्ती हा खेळ पूर्वीसारखा राहिला नाही आता कुस्तीकडे खेळाडूंनी करिअर म्हणून पाहिले पाहिजे कुस्तीमुळे शरीर आणि मन तंदुरुस्त राहते. तरुणांनी नियमित व्यायाम केला पाहिजे तसेच या कुस्ती केंद्राचा चांगला उपयोग करून घेतला पाहिजे. आपल्या ताकतीचा उपयोग चांगल्या कामासाठी व वाद मिटवण्यासाठी केला पाहिजे. तसेच पै.उमेश सुळ, युवराज केचे यांनी मनोगत व्यक्त केले प्रास्ताविकात सरपंच बाजीराव काटकर म्हणाले की इलेक्शन होऊन दोन वर्षे झाली गावामध्ये अनेक विकास कामे झाली आहेत गावात सीसीटीव्ही कॅमेरे, पाणी व्यवस्थापन, रस्त्याची कामे, 225 एलईडी, बसवण्यात आले आहेत .तसेच हाय मस्ट लॅम्प सुद्धा बसवण्यात आले आहेत. दरवर्षी पालखीचे जंगी स्वागत करण्यात येते. या कार्यक्रमासाठी दादासाहेब काटकर, पैलवान शंकर काळे, पांडुरंग कर्चे, दादा जवळकर,पत्रकार बंधु  ग्रामस्थ व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे आयोजन ग्रामपंचायत धर्मपुरी यांच्यावतीने करण्यात आले होते.कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सर्व सदस्य व कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.