माळशिरस तालुक्यात पत्रकार व कर्मचाऱ्यांसह अत्यावश्यक सेवा लोकांचे पेट्रोल विना गैरसोय

तालुक्यात पत्रकार व कर्मचाऱ्यांसह अत्यावश्यक सेवा लोकांचे पेट्रोल विना गैरसोय
पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क (प्रमोद शिंदे) माळशिरस तालुक्यामध्ये पत्रकारांसह कर्मचारी वर्ग व अत्यावश्यक सेवा करणाऱ्या लोकांची पेट्रोलपंप वाले पेट्रोल देत नसल्या कारणाने गैरसोय होत आहे. पत्रकार हा लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ मानला जातो तसेच पत्रकार मुळे परिसरातील चालू घडामोडी तळागळातील सर्वसामान्यांपर्यंत पोहोचत असतात सध्या कोरोनाव्हायरस प्रादुर्भाव असल्यामुळे पत्रकार स्वतःचा जीव धोक्यात घालून कोरोना रोगाविषयी जनजागृती करीत आहेत. तसेच बातम्या कव्हरसाठी पत्रकारांना बाहेर पडावे लागते. पत्रकार सुद्धा अत्यावश्यक सेवेमध्ये मोडतात परंतु पंप चालकांच्या आडमुठेपणामुळे पत्रकारांना पेट्रोल मिळत नाही. सोलापूर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी सन्माननीय मिलिंद शंभरकर साहेब यांनी दिनांक 27 मार्च 2020 रोजी परिपत्रक काढले आहे. या परिपत्रकात पत्रकार अत्यावश्यक सेवेत मोडतात त्यांना पेट्रोल देण्याचे आदेश परिपत्रकात दिले आहेत.तरीसुद्धा त्यांच्या आदेशाला पेट्रोल पंप चालकाकडून केराची टोपली दाखवली जात आहे. यावर प्रांत अधिकारी व तहसीलदार यांनी पेट्रोलपंप चालकांना पत्रकारांना पेट्रोल देण्याचे आदेश करावेत अशी मागणी महाराष्ट्र पत्रकार संघ यांच्याकडून होत आहे. पत्रकारांसह अत्यावश्यक सेवेमध्ये असणाऱ्या कर्मचाऱ्यांना सुद्धा पेट्रोल पंपावर पेट्रोल भरण्यासाठी अडवले जात आहे. याची दखल आपत्ती व्यवस्थापन अध्यक्ष या नात्याने मा.उपविभागीय प्रांत अधिकारी यांनी घ्यायला हवी. व यासंदर्भात पेट्रोल पंप वाल्यांना आदेश द्यावेत दिनांक 27 मार्च रोजी आपत्ती व्यवस्थापन अध्यक्ष प्रांत सो यांनी अत्यावश्यक सेवा कर्मचाऱ्यांसाठी पेट्रोल देण्यासंदर्भात आदेश काढले होते परंतु आज त्यांनासुद्धा पेट्रोल पंपावर ती पेट्रोल दिले गेले नाही. ही बाब गंभीर असून यावर मा.उपविभागीय दंडाधिकारी प्रांत व मा.तहसीलदार साहेब यांनी लक्ष देणे गरजेचे आहे.