नातेपुतेत महावीर जयंतीनिमित्त अत्यावश्यक वस्तूंचे वाटप*
पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क नातेपुते ( प्रमोद शिंदे) नातेपुते तालुका माळशिरस येथे सकल जैन समाज नातेपुते व महावीर सेना यांच्या वतीने अत्यावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले. श्री भगवान महावीर जयंती चे औचित्य साधून ग्रामीण रुग्णालयात व नातेपुते पोलीस स्टेशन तसेच सर्व नातेपुते परिसरातील दवाखान्यात फळे, बिस्कीट, मास्क सॅनिटायझर असे 200 किट चे वाटप करणात आले. यावेळी नातेपुते पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक युवराज खाडे, पंचायत समिती सदस्य माऊली पाटील, पोलीस नाईक शिवकुमार मदभावी. महावीर सेनेचे राहुल गांधी, संजय गांधी, वैभव शहा,अमित गांधी ,राजू डुडु, सुयोग दोशी, विनोद दोशी,सौरभ दोशी,हितेश दोशी, सुकुमार दोशी उपस्थित होते तसेच महावीर सेनेच्या कार्यकर्ते यांनी परिश्रम घेतले.


