आता सोने झाले स्वस्त,दिवाळापूर्वी सोनं चांदी स्वस्त,ग्राहकांची दिवाळी सोन्यावाणी.


 : दिवाळीपूर्वी सोने चांदी खरेदी आनंदाची बातमी समोर आली आहे. देशाची राजधानी दिल्लीत सलग दुसऱ्या दिवशी सोने स्वस्त झाले आहे. गुरुवारनंतर शुक्रवारी सोन्याच्या दरात मोठी घसरण पाहायला मिळाली. सोन्याच्या दरात १४५० रुपयांची घसरण झाली आहे. दुसरीकडे, चांदीच्या दरातही घसरण दिसून आली आहे. चांदीच्या दरात ३००० रुपयांची घसरण दिसून आली आहे. त्यानंतर दिल्लीत चांदीचा भाव १ लाख रुपयांच्या खाली आला आहे. त्यामुळं खरेदीदारांना मोठा संधी आहे.
परदेशात झालेल्या कमी म करणाऱ्यांसाठी ागणीमुळं सोन्या-चांदीच्या दरात घसरण झाली आहे. सोन्याची किंमत विक्रमी पातळीपासून १४५० रुपयांनी स्वस्त झाली आहे. दुसरीकडे, चांदीच्या दरातही घसरण दिसून आली आहे. ३००० रुपयांची ही घसरण दिसून आली आहे. सध्या दिल्लीत सोन्या चांदीचा नेमका किती दर आहे याबाबतची माहिती पाहुयात. ज्वेलर्स आणि किरकोळ विक्रेत्यांच्या मंद मागणीमुळे शुक्रवारी राष्ट्रीय राजधानी दिल्लीच्या सराफा बाजारात सोन्याचा भाव १,१५० रुपयांनी घसरून ८०,०५० रुपये प्रति १० ग्रॅम झाला. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *