माळशिरस विधानसभेचा भाजपचा उमेदवार कोण ? सर्वत्र चर्चेला उधाण

नातेपुते प्रतिनिधी प्रमोद शिंदे-


महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजला असून अगदी संपूर्ण तयारी अंतिम टप्प्यात आले असून.तरीसुद्धा माळशिरस विधानसभा 254 या मतदारसंघातील भाजपचा उमेदवार कोण? हा सस्पेन्स अद्यापही कायम राहिला आहे.भाजपवर प्रेम करणारे कार्यकर्ते ही संभ्रम अवस्थेत असताना दिसत आहेत.सर्वत्र दबक्या आवाजात चर्चा चालू आहे. तिकडे शरदचंद्रजी पवार गटाचे उमेदवार उत्तराराव जानकर यांनी आपली उमेदवारी जाहीर होण्याच्या अगोदरपासूनच मोहिते-पाटील यांच्यासोबत प्रचाराला सुरुवात केली आहे.पहिल्या यादी उत्तमराव जानकर यांचे राष्ट्रवादी शरदचंद्रजी पवार यांच्या यादीत नाव नसताना सुद्धा. उत्तमरावजी जानकर हे उत्साहाने प्रचार करताना दिसून आले दुसऱ्या यादी उत्तमराव जानकर यांची उमेदवारी जाहीर झाली आहे. परंतु भाजपचा उमेदवार कोण? हा प्रश्न अद्यापही सस्पेन्सच राहिलेला आहे त्यामुळे भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम अवस्था निर्माण झालेली दिसते. 2019 च्या विधानसभेला भाजप मधून आमदार राम सातपुते यांनी निवडणूक लढवली होती व ते या मतदारसंघातून केवळ 2702 मताधिक्याने निवडून आले होते. 2019 ला मोहिते-पाटील कुटुंबिया यांनी भाजपमध्ये प्रवेश करून माळशिरस विधान सभेमध्ये भाजपचे अधिकृत उमेदवार आमदार राम सातपुते यांना पाठिंबा दिला होता.तिकडे उत्तमराव जानकर हे मोहिते-पाटील विरोधक म्हणून राष्ट्रवादीतून उभे होते. परंतु केवळ 27O2 मताने उत्तम जानकर यांचा 2019 ला निसटत पराभव झाला होता.परंतु 2024 मध्ये लोकसभेला भाजपने मोहिते पाटील व उत्तमराव जानकर यांना डावल्यामुळे पुन्हा मोहिते-पाटील यांनी शरदचंद्रजी पवार यांच्या पक्षात प्रवेश केला.पाठोपाठ उत्तमराव जानकर ही शरदचंद्र पवार त्यांच्या पक्षात राहिले.लोकसभेला उत्तमराव जानकर यांनी मोहिते पाटील यांच्याशी मनोमिलन करून खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांना पाठिंबा देऊन धैर्यशील मोहिते-पाटील यांना लीड दिले. माळशिरस तालुक्यातील एकमेकांचे कट्टर विरोधक असलेले हे आता शरदचंद्रजी पवार यांच्या पक्षामध्ये आल्याने. त्यांची ताकद दुप्पट झाल्याचे दिसून येत आहे. यावर भाजपची ताकद कमी झाल्याचं तालुक्यात पाहायला मिळत आहे. परंतु भाजपाचे निष्ठावंत कार्यकर्ते जीवा सरांकडून अशा तालुक्यात पक्षाला उभारी देण्याचं काम स्थानिक कार्यकर्ते व नेते मंडळींनी केले होते.परंतु अध्याप ही उमेदवारी जाहीर न झाल्यामुळे. भाजपचे सर्व निष्ठावंत कार्यकर्ते शांत असल्याचं दिसून येत आहे. पुन्हा आमदार राम सातपुते यांनीच माळशिरस विधानसभा निवडणूक लढवावी असे भाजपच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांची इच्छा असल्याचे समजते. परंतु सध्या माळशिरस तालुक्यामध्ये राष्ट्रवादी शरदचंद्रजी पवार पक्षाची ताकद वाढल्याने भाजप पुढे मोठा पेच पडला परंतु भाजपचे आमदार राम सातपुते यांनी पाच वर्षात अनेक विधायक कामे केल्याने व अनेक लोकांना वैद्यकीय मदत केल्याने आमदार राम सातपुते यांची आरोग्य दूत म्हणून तालुक्यात ओळख निर्माण झाली आहे व त्यांचा स्वतंत्र गट निर्माण झाला आहे. याच कामाच्या व गटाच्या जोरावर ते निवडणूक लढू शकतात परंतु.भाजप कोणता डाव खेळणार हा येणारा काळ सांगू शकेल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *