आधार कार्डावरची जन्मतारीख वय निश्चिती साठीचा पुरावा नाही..

पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क –

आधार कार्डावरची जन्मतारीख वय निश्चितीसाठीचा पुरावा नाही
आधार कार्ड हे जन्माचा पुरावा म्हणून मान्य नाही असं म्हटलं आहे. जस्टिस संजय करोल आणि जस्टिस उज्जल भुइयां यांच्या खंडपीठाने या संबंधीचा निकाल दिला आहे. सर्वोच्च न्यायालायने हे म्हटलं आहे की मृत व्यक्तीचं वय ठरवण्यासाठी आधार कार्डवर उल्लेख करण्यात आलेल्या जन्म तारखेऐवजी शाळा सोडल्याचा दाखला हा ग्राह्य धरावा.
मोटार अपघात संबंधीचा दावा न्यालयात  होता. ज्यामध्ये नुकसान भरपाई म्हणून १९ लाख ३५ हजार ४०० रुपये भरपाई देण्याचा निर्णय दिला गेला. उच्च न्यायालयाने ही रक्कम कमी करुन ९ लाख २२ हजार ३३६ रुपये केली. अपघातात ज्या व्यक्तीचा मृत्यू झाला त्या व्यक्तीचं मृत्यूच्या वेळी असलेलं वय ठरवण्यासाठी आधार कार्डवर असलेल्या जन्म तारखेचा उल्लेख ग्राह्य धरला होता. त्यानुसार मृत व्यक्तीचं वय ४७ धरलं होतं आणि उच्च न्यायालयाने भरपाईची रक्कम निम्मी केली होती. उच्च न्यायालयाने दिलेल्या या निर्णयाला आव्हान देत याचिकाकर्त्यांनी सर्वोच्च न्यायालयाचा दरवाजा ठोठावला. त्यावेळी आधार कार्डवरची जन्मतारीख आणि त्यानुसार ठरवण्यात आलेलं वय चुकीचं असल्याचं निरीक्षण नोंदवलं. तसंच आधार कार्डवरची जन्मतारीख वय ठरवण्यासाठी ग्राह्य धरली जाणार नाही असंही म्हटलं आहे. सर्वोच्च न्यायालायने दिलेल्या निर्णयानुसार ज्या व्यक्तीचा मृत्यू झाला त्याचं मृत्यूसमयी वय ४५ होतं.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *