माळशिरस विधानसभा मतदारसंघामध्ये निवडणूककामी नियुक्त कर्मचारी / अधिकारी यांचे निवडणूक बाबत 26व 27ऑक्टोबर रोजी प्रशिक्षण

पुरोगामी महााष्ट्र न्युज नेटवर्क

माळशिरस (अ.जा.) २५४विधानसभा मतदारसंघ
ची निवडणूक प्रक्रिया सुरु झाली असून, 29ऑक्टोबर रोजी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस आहे. तर 30रोजी अर्जाची छाननी होणार आहे. 4नोव्हेंबर रोजी अर्ज मागे घेता येणार आहे. 20नोव्हेंबर रोजी संपूर्ण राज्यात एकाच टप्यात निवडणूक होणार असून 23नोव्हेंबर रोजी अकलूज येथे वखार महामंडळ च्या गोडाऊन मध्ये मतमोजणी होणार आहे.
25ऑक्टोबर अखेर 42उमेदवारांनी एकूण 63अर्ज खरेदी केले असून एका अपक्ष उमेदवाराने आपला अर्ज दाखल केला आहे.
२५४ माळशिरस (अ.जा) विधानसभा मतदारसंघामध्ये निवडणूककामी नियुक्त कर्मचारी / अधिकारी यांचे निवडणूक बाबत प्रशिक्षण दि. २६/१०/२०२४ व दि. २७/१०/२०२४ रोजी चार टप्प्यात होणार असून दोन्ही दिवशी सकाळी १०.०० ते दुपारी १.०० वापेजर्यंत व दुपारी २.०० ते सांयकाळी ५.०० वाजेपर्यंत या दोन सत्रात प्रत्येकी ४५० कर्मचारी / अधिकारी यांचे प्रशिक्षण स्मृती भवन अकलूज येथे होणार असून, त्याच दिवशी सकाळी १०.०० ते दुपारी १.०० वाजेपर्यंत व दुपारी २.०० ते सांयकाळी ५.०० वाजेपर्यंत मतदानयंत्र हाताळणी बाबतचे प्रशिक्षण महर्षी प्रशाला यशवंतनगर येथे होणार आहे. दोन्ही दिवशी १८०४ कर्मचारी / अधिकारी यांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे.

You may have missed