गुलाल उधळला नाही तर फाशी घेऊन मरीन- शहाजी बापू पाटील
पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क-
शहाजीबापू पाटील संजय राऊतांवर कडाडले शिंदे गटाकडून विधानसभा निवडणुकीसाठी ४५ उमेदवारांचीयादी मंगळवारी जाहीर करण्यात आली. या यादीमध्येमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेलेल्या आमदारांनापुन्हा एकदा संधी देण्यात आली आहे. सांगोल्यातूनशहाजीबापू पाटील यांना उमेदवारी मिळाली आहे. खेड-शिवापूर टोलनाक्यावर गाडीत पाच कोटी रुपयांची रोकडसापडल्यानंतर शहाजीबापू पाटील यांचे नाव पुढे आले होते.महाविकास आघाडीच्या नेत्यांनी शहाजीबापू पाटील यांनालक्ष्य केलं होतं. त्यामुळे त्यांच्या उमेदवारीबाबत चर्चा सुरुझाल्या होत्या. मात्र आता शिंदे गटाने उमेदवारी दिल्यानंतरशहाजी बापू पाटील यांनी गुलाल नाय उधळला तर फाशीघेऊन मरेन, असं आव्हान दिलं आहे.”मला पैशांबद्दल सांगोल्यात माहिती मिळाली. ते पैसे रफीक नदाक नावाच्या उद्योगपतीचे आहेत. त्यांनी त्या पैशांची जबाबदारी घेतलेली आहे. याचा राजकीय फायदा घेण्याचा प्रयत्न केला जात आहे. असल्या गोष्टीचा महाराष्ट्राच्या जनतेवर कोणताही परिणाम होणार नाही. पाठवलेले पैसे पाच कोटी पेक्षा जास्त असल्याचा आरोप करणारे रोहित पवार रफिक भाईंचे पैसे मोजायला गेले होते का? रफिक भाईची श्रीमंती संपूर्ण तालुक्याला माहीत असून त्यांनी हे पैसे आपले असल्याचे सांगितल्याने आता हा विषय संपलेला आहे,” असं स्पष्टीकरण शहाजीबापू पाटील यांनी दिलं.विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथशिंदे यांनी शिवसेनेच्या उमेदवारांची पहिली यादी जाहीरकेली. शिवसेनेकडून ४० विद्यामान आमदारांना पुन्हाउमदवारी देण्यात आली. सांगोल्यातून पुन्हा एकदाशहाजीबापू पाटील यांना उमेदवारी देण्यात आली आहे.एबीपी माझाला दिलेल्या मुलाखतीमध्ये उमेदवारीमिळाल्यानंतर शहाजीबापू पाटील यांनी निवडणूक जिंकलोनाही तर फाशी घेईन असं आव्हान दिलं आहे. तसेचखासदार संजय राऊत यांनाही शहाजीबापू पाटील यांनीइशारा दिला आहे.तुम्ही सात-आठ सभा घ्याव्यात. पण मी विजयाचा गुलाल उधळला नाही, तर फास घेऊन मरेन, असे आव्हान सांगोल्याचे आमदार शहाजीबापू पाटील यांनी संजय राऊत यांना दिले आहे. तसेच शहाजी पाटील यांनी पुण्यात सापडलेल्या पैशांवरुन रोहित पवारांवर टीकास्त्र डागलं. “माझ्याविरोधात संजय राऊत, त्याचा बाप, आजा यांनी एक नाही तर दहा सभा घेऊ देत. मी त्याला पालथा पाडून तुडवून पुढे जाऊन दाखवणार. उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांच्याकडे कोणतेही व्हिजन नाही. माझ्यावर टीका करण्याशिवाय त्यांच्याकडे काही मुद्दाच नाही. त्यामुळे आज संजय राऊतांना सांगतो, तुम्ही सात-आठ सभा घ्या, मी विजयाचा गुलाल उधळला नाही, तर फास घेऊन मरेन,” असं शहाजीबापू पाटील म्हणाले.