लग्नाच्या आमिषाने पावणे अकरा लाखाची फसवणूक : लग्नाच्या आमिषाने विविध…
पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
विविध कारणास्तव सुमारे १० लाख ७४ हजार रुपये घेऊन महिलेची फसवणूक केली. हा प्रकार सप्टेंबर २०२३ ते जून २०२४ दरम्यान घडला.
याबाबत धनश्री अभिजित हातोळकर (वय ४२,रा. क्रिडा संकुल शेजारी अकलूज) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून दिपक विद्याधर अराणके (वय ५०, रा. सातारा) विरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील फिर्यादी आणि आरोपी यांची सप्टेंबर २०२३ मध्ये ओळख झाली. तेंव्हापासून ते एकेमेकांना ओळखतात. यातून त्यांच्यात विश्वास निम णि झाला. यातूनच आरोपीने फिर्यादीला
त्यांच्याबरोबर लग्न करणार असल्याचे सांगितले. यानंतर वेळोवेळी आरोपीने फिर्यादीकडे शेतजमीन विकत घेण्यासाठी तसेच इतर कारणांसाठी बँकेतून, गुगल पे व्दारा तसेच रोख स्वरूपात पेसे घेतले.
लग्न करणार असल्याने फिर्यादीने विश्वासाने आरोपीला मागेल त्यावेळी पैसे दिले. परंतु जून महिन्यात आरोपीने लग्नास टाळाटाळ केली. यानंतरही आरोपीकडे लग्नाबाबत फिर्यादीने विचारणा केली. मात्र आरोपीने लग्नास नकार देऊन फिर्यादीकडून पावणेअकरा लाख घेऊन त्यांची फसवणूक केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. या गुन्हयाचा तपास सपोनि चौधरी करत आहेत.