पुन्हा एकदा भाजपाची माळशिरस विधानसभा राम भरोसे

 पुरोगामी महाराष्ट्र न्यूज प्रमोद शिंदे –


https://youtu.be/1S4DW_PuWmQ?si=F1YPJzXkFUR2fe1L

2024 विधानसभा निवडणुकी चे रणसिंग फुंकून बराच कालावधी झाला व तयारी अंतिम टप्प्यात आली असताना. अद्यापही भाजपाची असणारी माळशिरस विधानसभा राम भरोसे होती.अंतिम टप्प्यात असताना सुद्धा उमेदवारा संदर्भात संभ्रम होता.कार्यकर्त्यांमध्ये सुद्धा उत्सुकता असून उमेदवार जाहीर नसल्याने कार्यकर्ते थंडावले होते.अखेर आज भाजपने आपला उमेदवार जाहीर केला आहे.पुन्हा एकदा आमदार राम सातपुते यांना उमेदवारी दिली असून. माळशिरस विधानसभा राम भरोसे म्हणजेच रामभाऊ सातपुते यांच्या भरोशावरती ही निवडणूक भाजपाला लढवावी लागणार आहे. कारण 2019 ला मोहिते-पाटील कुटुंबीयांनी भाजपमध्ये प्रवेश करून भाजपला ताकद दिली होती.भाजप समोर तगडे आव्हान असलेले उत्तमराव जानकर यांची माळशिरस तालुक्यात मोठी ताकद  असल्याने एकट्या भाजपला त्यांच्याविरुद्ध लढून जिंकून येणे अशक्य बाब होती. यात  मोहिते-पाटलांनी भाजपमध्ये प्रवेश करून भाजपचे उमेदवार रामभाऊ सातपुते यांना पाठिंबा देऊन 2702 मातांनी थोडक्या मताधिक्याने निवडून आणले होते. परंतु भाजपला 2019 मोहिते पाटील यांनी मदत करून सुद्धा. 2024 ला लोकसभेला मात्र भाजपने डावलले. भाजपने त्या बदल्यात आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांना विधान परिषद दिली होती.व कारखाना उभा करण्यासाठी मदत केल्याचे समजते. तसेच उत्तम जानकरांच्या बाबतीतही लोकसभेला त्यांना डावल्यामुळे ते राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटासोबत गेले. उत्तम जानकर यांनी लोकसभेला मोहिते-पाटील यांना ताकतीने मदत केली.व राजकीय वैर संपुष्टात आणले. त्या बदल्यात मोहिते-पाटील यांनी उत्तम जानकर यांना विधानसभेला मदत करण्याचे ठरवले. दोन्ही ही मोठ्या ताकती एकत्र आल्याने.भाजपच्या पुढे मोठे आव्हान उभे झाले आहे.त्यामुळे भाजपने लवकर उमेदवार जाहीर केलेला नव्हता. या मतदारसंघात गेली पाच वर्ष राम सातपुते यांनी चांगल्या पद्धतीने काम केले असून. त्यांनी अनेक लोकांना आरोग्य संदर्भात मदत केली आहे. विविध प्रकारच्या रुग्णांची लाखो रुपयांची ऑपरेशन त्यांच्या माध्यमातून मोफत करण्यात आली. कामाच्या जोरावर आमदार राम सातपुते यांना मानणारा गट सुद्धा तयार झाला आहे. याच जोरावर ते माळशिरस विधानसभा निवडणूक लढवून चांगली मते मिळू शकतात. दोन्ही विरोधक गट एकत्र आल्याने भाजपाची असणारी माळशिरस विधानसभा ही रामभरोसे म्हणजेच रामभाऊ सातपुते यांच्या कामाच्या भरोशावर असल्याचं पाहायला मिळते सकाळी साडेनऊ वाजता धर्मपुरी येथे राम सातपुते यांचे जंगी स्वागत करण्यात येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *