जवानांविषयी मुलांमध्ये प्रेम निर्माण केले पाहिजे : सुभेदार चव्हाण

श्रीमंतयोगी युवक प्रतिष्ठानचा उपक्रम : जवानांसमवेत लहान मुलांनी केली दिवाळी साजरी

महाराष्ट्र न्यूज नेटवर्क प्रमोद शिंदे-

लहान मुलांमध्ये भारतीय जवानांविषयी प्रेम निर्माण झाले तर येणार्‍या काळात त्यांच्या मनात सैन्यात भरती होण्याची इच्छा निर्माण होईल. आजी – माजी सैनिकांसमवेत दिवाळी साजरी करणे हा उपक्रम स्तुत्य आहे. एक वेगळे समाधान यातून लाभते, असे प्रतिपादन सुभेदार तानाजी चव्हाण यांनी केले.
श्रीमंतयोगी युवक प्रतिष्ठानच्यावतीने सात रस्ता म्हाडा कॉलनी येथील आदर्श बालक मंदिर प्रशाला शाळेत विद्यार्थ्यांनी माजी सैनिकांसमवेत दिवाळी साजरी केली. त्याप्रसंगी ते बोलत होते. व्यासपीठावर प्रमुख पाहुणे म्हणून नाईन महाराष्ट्र एनसीसी बटालियन सोलापूरचे सुभेदार तानाजी चव्हाण, हवालदार निलेश तांबे, नव दलातील मास्टरचिप पेटीओ निवृत्त ऑफिसर सचिन देशपांडे, अशोक विद्युतचे प्रमुख संजीव मुंदडा, सोलापूर जिल्हा माहेश्वरी युवा संघटनेचे अध्यक्ष विठ्ठल काबरा, छत्रपती शिवाजी नाईट कॉलेज शारीरिक शिक्षणचे संचालक संतोष गवळी, आदर्श बालक मंदिर संस्थेचे सचिव अरूणराव गायकवाड, प्रशालेचे मुख्याध्यापक औदुंबर धोत्रे, प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष महेश कासट आदी मान्यवर उपस्थित होते.
दिवाळीनिमित्त शाळेतील विद्यार्थ्यांना प्रतिष्ठानच्यावतीने शंकरपाळी, लाडू, चिवडा व चकली (फराळ) पदार्थ यावेळी वाटप करण्यात आला. देशाच्या संरक्षणासाठी सीमेवर लढलेल्या सैनिकांच्या हस्ते फराळ खाऊ मिळाल्यामुळे मुलांच्या चेहऱ्यावर आनंद दिसून आला. सुत्रसंचालन ऐश्वर्या संगटे यांनी केले तर आभार प्रदर्शन मोहन साठे यांनी केले.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अक्षता कासट, मनुश्री कासट, संतोष अलकुंटे, शिला तापडिया, निशांत वाघमारे, गणेश माने, महेश ढेंगले, रंजना ढेंगले, राहुल बिराजदार, भारती जवळे, सुजाता सक्करगी, तुप्ती पुजारी, स्वराज ढेंगले, प्रविण तळे, सुरेश लकडे आदी कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *