चोऱ्या दरोडे रोखण्यासाठी नागरिकांनीही दक्षता घ्यावी- ए.पी.आय परजणे

चोऱ्या, दरोडे रोखण्याचे काम पोलिसांचे असले, तरी एक सुजाण नागरिक म्हणून परिसरातील चोऱ्या दरोडे रोखण्यासाठी नागरिकांची महत्वाची आहे, असे आव ाहन नातेपुते पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक महारुद्र परजणे यांनी केले आहे. नागरिक व तरुणांना चोऱ्या, दरोडा पडण्याआधी कोणती काळजी घ्यावी, काय उपाययोजना कराव्यात. याचे मार्गदर्शन पोलिसांकडून देऊन तरुणांना ग्रामसुरक्षा दलात सहभागी होण्याचे आवाहनही पोलिसांनी केले आहे. दिवाळीच्या सुट्टी असल्याने अनेक नागरिक घराला लॉक लावून कुटुंबासह परगावी फिरावयास जातात मात्र परगावी जात असताना आपल्या घरातील सोन्या चांदीचे दागिने, पैसा व मौल्यवान वस्तू घरातील कपाटात तसेच ठेवून जातात या संधीचा फायदा घेऊन घर फोडून घरातील सोन्या-चांदीचे दागिने पैसा व मौल्यवान वस्तू चोर चोरी करून घेऊन जातात. त्यामुळे आपले खूप मोठे नुकसान होते. चोरीहोऊ नये यासाठी नागरिकांनी बाहेरगावी जाताना सोन्या चांदीचे दागिने पैसा व मौल्यवान वस्तू सुरक्षित ठिकाणी ठेवणे गरजेचे आहे. पोलीस वाहन घेऊन पोलीस गस्तीचे प्रमाण वाढवले आहे. परंतु एकाच वेळी प्रत्येक वस्ती व वाडी ठिकाणी हे वाहन पोहचू शकत नाही. त्यामुळे नागरिकांनी सतर्कता बाळगून काही संशयास्पद वाटल्यास आपत्कालीन नंबर ११२ यावरती तात्काळ पो- लीस ठाण्याशी संपर्क करून माहिती देऊ शकता. असे आ- वाहन नागरिकांना नातेपुते पो- लीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक महारुद्र परजणे यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed