BSNL चा शानदार प्लॅन मिळवण्याचा आजचा शेवटचा दिवस, 365 दिवसांसाठी मिळेल 600GB डेटा!

BSNL Recharge Plan : BSNL ने दिवाळीच्या मुहूर्तावर लाँच केलेली ऑफर 28 ऑक्टोबर ते 7 नोव्हेंबरपर्यंत आहे.

BSNL चा शानदार प्लॅन मिळवण्याचा आजचा शेवटचा दिवस, 365 दिवसांसाठी मिळेल 600GB डेटा!
googleNews

: दिवाळीच्या मुहूर्तावर Jio, Airtel आणि Vi सारख्या बड्या टेलिकॉम कंपन्यांनी आपल्या ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी नवीन प्लॅन लाँच केले आहेत. यादरम्यान, सरकारी टेलिकॉम कंपनी BSNL सुद्धा लोकांना आकर्षित करण्यासाठी अनेक नवीन गोष्टी करत आहे. BSNL ने सुद्धा दिवाळीच्या मुहूर्तावर नवीन ऑफर आणली होती, जी दिवाळीनंतरही सुरूच आहे. मात्र, या ऑफरचा आजचा शेवटचा दिवस आहे.

BSNL ने दिवाळीच्या मुहूर्तावर लाँच केलेली ऑफर 28 ऑक्टोबर ते 7 नोव्हेंबरपर्यंत आहे. या ऑफरअंतर्गत तुम्ही 1999 रुपयांचा रिचार्ज केल्यास तुम्हाला 100 रुपयांची सूट मिळू शकते. म्हणजेच ग्राहकाला फक्त 1899 रुपये द्यावे लागतील. या प्लॅनमध्ये तुम्हाला एक वर्षासाठी 600GB डेटा, अनलिमिटेड कॉलिंग आणि 100 एसएमएस दररोज मिळतील.BSNL ने अलीकडेच आपल्या एक्स हँडलद्वारे या नवीन ऑफरबद्दल माहिती शेअर केली आहे. या अंतर्गत तुम्ही 1999 रुपयांचा रिचार्ज केल्यास तुम्हाला 100 रुपयांची सूट मिळेल. या रिचार्जसाठी तुम्हाला फक्त 1899 रुपये द्यावे लागतील. यासोबतच गेम्स, म्युझिक आणि बरेच काही लाभ मिळतील.दरम्यान, BSNL सध्या 5G सेवा सुरू करण्याच्या तयारीत आहे. तसेच, सरकारी दूरसंचार कंपनी BSNL ने अलीकडेच इंडियन मोबाईल काँग्रेसमध्ये आपला नवीन लोगो आणि स्लोगन लाँच केले होते. तसेच आपल्या 7 नवीन सेवा सुरू करण्याची घोषणा केली. या 7 सेवांपैकी एक BSNL ची D2D म्हणजेच “डिरेक्ट टू डिव्हाईस” सेवा आहे. BSNL च्या D2D सेवेसह, लोक सिम कार्ड आणि मोबाईल नेटवर्कशिवाय कॉल करू शकतात. D2D सेवा कशी काम करते?बीएसएनएलची D2D सेवा सॅटेलाइट तंत्रज्ञानाद्वारे काम करते. सॅटेलाइट आकाशातील मोठमोठ्या टॉवर्सप्रमाणे काम करतात. कॉलिंगला सपोर्ट करण्यासाठी, ते एका मोबाइलला दुसऱ्या मोबाइलला जोडते, ज्यामुळे कॉलिंग शक्य होते. सध्या बीएसएनएल या सेवेची चाचणी घेत आहे. बीएसएनएलने यासाठी वायसॅट नावाच्या कंपनीसोबत भागीदारी केली आहे. वायसॅट कंपनी सॅटेलाइट कनेक्टिव्हिटी पुरवते. आणखी वाचाटॅग्स :बीएसएनएलतंत्रज्ञान

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed