माळशिरस तालुक्यात कसं? दादा म्हणतील तसं-खा. डॉ. अमोल कोल्हे

पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क प्रमोद शिंदे-

254 अनुसूचित जाती माळशिरस विधानसभा राष्ट्रवादी शरदचंद्रजी पवार गटाचे उमेदवार उत्तमराव जानकर यांच्या प्रचारा निमित्त नातेपुते येथे खासदार डॉ.अमोल कोल्हे यांची प्रचार सभा संपन्न झाली.बोलताना डॉक्टर अमोल कोल्हे म्हणाले की पडत्या काळात सोलापूर जिल्ह्याचा ढाण्या वाघ विजयसिंह मोहिते पाटील पवार साहेबांच्या सोबत उभे राहिले, आणि महाराष्ट्राच चित्र पालटलं. पुढे बोलताना म्हणाले माळशिरस तालुक्यात कसं? तेव्हा समोर बसलेल्या जनतेतून आवाज आला दादा म्हणतील तसं.धैर्यशील मोहिते पाटील यांच्या रूपाने आपण सर्वांनी संसदेमध्ये ढाण्या वाघ पाठवला आहे. तुमची बॅग तपासली असा प्रश्न विचारला असता कोल्हे म्हणाले आमच्या बॅगेत निष्ठा आणि विश्वास याशिवाय काय सापडणार?
तसेच त्यांनी भाजप उमेदवार राम सातपुते यांच्यावर टीका करत उत्तम जानकर यांना बहुमताने निवडून देण्याचे आवाहन केले.याप्रसंगी विधानसभा उमेदवार उत्तमराव जानकर म्हणाले या तालुक्यातील बौद्ध,मुस्लिम,मातंग,धनगर, मराठा,हिंदू खाटीक सर्व जाती धर्माच्या लोकांनी पाठिंबा दिला आहे.मी जातीच्या धर्माच्या पलीकडचा माणूस आहे. मा.आमदार आर.जी आप्पा रुपनवर म्हणाले भाजपने संविधानाच्या मूळ ढाच्याला हात घातला आहे. संविधान बदलण्याचा प्रयत्न भाजप करतोय.,लक्ष्मण ढोबळे म्हणाले या राज्यातील शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्याचं काम पवार साहेब यांनी केला आहे,.प्रास्ताविकेत मा.जि प उपाध्यक्ष बाबाराजे देशमुख म्हणाले दोन्ही गटाचे कार्यकर्ते एकत्र येऊन लोकसभा लढवली विधानसभा ही त्याच ताकतीने लढून उत्तमराव जानकर यांना महाराष्ट्रात एक नंबर मताधिक्याने निवडून देऊ.सर्व नेत्यांनी भाजपवर टीका करत उत्तमराव जानकर यांना निवडून देण्याबाबत आवाहन केले. तसेच याप्रसंगी बौद्ध समाज, वडार समाज, मातंग समाज, हिंदू खाटीक, मुस्लिम समाज,यांनी उत्तमराव जानकर यांना जाहीर पाठिंबा दिला.या सभेसाठी माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील,अर्जुनसिंह मोहिते पाटील, विकास दादा धाईंजे, नगराध्यक्ष अनिता लांडगे,मालोजीराजे देशमुख, पंचायत समिती सदस्य माऊली पाटील,अजय सकट,संदीप ठोंबरे, विशाल साळवे, सागर बिचुकले,तसेच परिसरातील अनेक नेते कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते
.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed