तर भारताचा जगात नावलौकिक व्हायला वेळ लागणार नाही……. ! डॉ. उदय निरगुडकर.
रत्नत्रय शैक्षणिक संकुलात शिक्षकांशी संवाद .
भारत हा विकसनशील देश आहे. शिक्षण ही काळाची गरज आहे. शिक्षणामुळेच माणसाची प्रगती होते. माणसाची प्रगती झाली की देशाची प्रगती होणार आहे. त्यामुळे भारताचा नावलौकिक जगात होईल. शिक्षणाने माणसाची जीवनशैली सुधारते. प्रत्येक शिक्षकाने शास्त्रज्ञ म्हणून स्वतःचा वर्ग ही एक प्रयोगशाळा आहे असे समजून विविध प्रयोग करणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले. शिक्षकांनी विद्यार्थ्यांमध्ये नैतिक मूल्य रुजवणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले. ते पुढे म्हणाले मोबाईल मुक्त विद्यार्थी तयार करणे गरजेचे आहे. भारतीय शिक्षण पद्धती व परदेशातील शिक्षण पद्धती मधील फरक सांगून शिक्षकांनी कोणत्या प्रकारे अध्यापन करावे याच्या सूचनाही त्यांनी दिल्या. जगाच्या तुलनेत भारतात शिक्षकांची परंपरा खूप मोठी आहे. आर्य चाणक्य त्यापैकी एक होते. उद्याचा विश्वगुरू भारत घडवायचा असेल तर शिक्षकांची भूमिका खूप मोठी आहे. शिक्षकांना राष्ट्रसेवा करण्याची खूप मोठी संधी असते. शिक्षकांनी या क्षेत्रामध्ये काम करत असताना वेगवेगळ्या प्रकारचे संशोधन केले पाहिजे. त्याच माध्यमातून विद्यार्थी घडला तर उद्याचा विश्वगुरू असणारा भारत निश्चित घडेल. शिक्षणातून बेकारी निर्माण होईल असे शिक्षण देण्यापेक्षा सुसंस्कृत विद्यार्थी घडवावा अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
सदर कार्यक्रमाप्रसंगी मा.डॉ. उदय निरगुडकर, रत्नत्रय एज्युकेशन सोसायटीचे सचिव, इंग्लिश मेडियम स्कूल चे चेअरमन व विलासचंद्र एम. मेहता आयटीआयचे दहिगाव चे मार्गदर्शक मा. श्री. प्रमोद भैया दोशी, मा. श्री. अभिजीत पाटील, मा. श्री. महादेव सर,रत्नत्रय इंग्लिश मीडियम स्कूल चे मुख्याध्यापक श्री दैवत वाघमोडे, विलासचंद्र एम. मेहता आयटीआयचे प्राचार्य श्री. गजेश जगताप, दहिगाव अकॅडमीचे मुख्याध्यापक श्री. सतीश हांगे, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.